ETV Bharat / sitara

यशच्या 'केजीएफ २' मध्ये रविना टंडन-संजय दत्त येणार एकत्र - KGF

रविना बऱ्याच काळापासून मोठ्या पडद्यापासून लांब होती. मात्र, 'केजीएफ २' या चित्रपटात तिचे नाव निश्चित केल्याचे बोलले जात आहे.

यशच्या 'केजीएफ २' मध्ये रविना टंडन-संजय दत्त येणार एकत्र
author img

By

Published : May 30, 2019, 9:18 AM IST

Updated : May 30, 2019, 11:52 AM IST

मुंबई - दाक्षिणात्य सुपरस्टार यशच्या 'केजीएफ' चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटानंतर त्याच्या सिक्वेलचीही तयारी सध्या सुरू आहे. या चित्रपटात बॉलिवूडची सुपरहिट जोडी रविना टंडन आणि संजय दत्त हे एकत्र भूमिका साकारणार आहेत.

एका माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, रविना टंडन या चित्रपटात इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. तर, संजय दत्त हा डॉनची भूमिका साकारणार आहे. अद्याप याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र, या चित्रपटासाठी रविना टंडनचे नाव निश्चित करण्यात आल्याचे बोलले जात आहे.

रविना बऱ्याच काळापासून मोठ्या पडद्यापासून लांब होती. रविना २००३ साली आलेल्या 'एलओसी कारगिल' या चित्रपटात झळकली होती. तर, संजय दत्तने अलिकडेच प्रदर्शित झालेल्या 'कलंक' चित्रपटात भूमिका साकारली होती.

'केजीएफ २' चे दिग्दर्शन हे प्रशांत नील हे करत आहेत.

Intro:Body:

ent 01

Conclusion:
Last Updated : May 30, 2019, 11:52 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.