ETV Bharat / sitara

धार्मिक द्वेष पसरवणाऱ्या यूट्यूब चॅनेलवर तामिळ सरकारच्या कारवाईचे रजनीकांत यांच्याकडून कौतुक

परमेश्वराच्या स्तुतीसाठी गायिलेले तामिळ भजन "कंदा साष्टी कवचम"ची निंदा करणारा व्हिडिओ एका यूट्यब चॅनलवर दाखवला जात होता. त्यावर सरकारने आता कारवाई केली आहे. सरकारच्या या कृत्याचे सुपरस्टार रजनीकांत यांनी कौतुक केले आहे.

rajinikanth
सुपरस्टार रजनीकांत
author img

By

Published : Jul 22, 2020, 3:26 PM IST

चेन्नई - भगवान मुरुगनचा अपमान करणे आणि धार्मिक द्वेष पसरवून दैवतांची बदनामी करणे किमान आता तरी थांबले पाहिजे, असे मत दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी व्यक्त केले आहे. असे कृत्य करणाऱ्या यूट्यूब वाहिनीवर कारवाई केल्याबद्दल रजनीकांत यांनी तामिळनाडू सरकारचे कौतुक केले आहे.

परमेश्वराच्या स्तुतीसाठी गायिलेले तामिळ भजन "कंदा साष्टी कवचम" यांच्या विटंबनेमुळे कोट्यवधी तमिळ लोकांच्या भावना दुखावल्याचे त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

ते म्हणाले, "कंदा साष्टी कवचम याची अत्यंत वाईट रीतीने निंदा करणाऱ्या आणि कोट्यवधी तामिळ लोकांच्या भावना दुखावणाऱ्यांवर त्वरित कारवाई केल्याबद्दल तामिळनाडू सरकारचे मनापासून कौतुक करतो. तसेच हा व्हिडिओ संबंधित यूट्यूब वाहिनीने काढून टाकल्याची बातमीही त्यांनी दिली.

हेही वाचा -अनुराग कश्यप म्हणजे बॉलिवूडचा "मिनी महेश भट्ट", कंगनाचा पलटवार

त्यांनी भजनाचे केलेले वर्णन खालच्या पातळीवरचे होते, असे म्हटलंय. तामिळ ट्विटमध्ये ते म्हणाले, "किमान आता तरी धार्मिक द्वेष आणि ईश्वर-पक्षपातीपणाचा अंत होऊ द्या."

यापूर्वीही धार्मिक द्वेष पसरवण्याचा प्रयत्न या चॅनल मार्फत करण्यात आला होता. त्यानंतर त्यांच्यावर पोलीस कारवाईही झाली होती. व्हिडिओमध्ये दिसलेल्या अँकरसह चार जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. संबंधित युट्यूब चॅनल कायमचे बंद करण्यात यावे अशी मागणीही शहरात होऊ लागली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.