मुंबई - ब्लॉकबस्टर चित्रपट 'बाहुबली'मध्ये 'भल्लालदेव'ची भूमिका साकारणारा अभिनेता लवकरच 'हाथी मेरे साथी' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच राणाने या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले होते. यामध्ये राणाची मुख्य भूमिका पाहायला मिळणार आहे. राणासोबत या चित्रपटात बॉलिवूडच्या एका अभिनेत्याची वर्णी लागली आहे. त्याचाही फर्स्ट लुक सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे.
अभिनेता पुलकित सम्राट या चित्रपटात राणासोबत भूमिका साकारताना दिसणार आहे. हा चित्रपट काझिरंगा राष्ट्रीय उद्यानमधील हत्तींवर आधारित आहे. जंगली प्राण्यांवर होणाऱ्या अत्याचारावर आधारित या चित्रपटाची कथा आहे.
-
#PulkitSamrat... New poster of #HaathiMereSaathi... Stars #RanaDaggubati... Directed by Prabu Solomon... Produced by Eros International... 2 April 2020 release in #Hindi, #Tamil and #Telugu. pic.twitter.com/GblkeppMrg
— taran adarsh (@taran_adarsh) February 22, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#PulkitSamrat... New poster of #HaathiMereSaathi... Stars #RanaDaggubati... Directed by Prabu Solomon... Produced by Eros International... 2 April 2020 release in #Hindi, #Tamil and #Telugu. pic.twitter.com/GblkeppMrg
— taran adarsh (@taran_adarsh) February 22, 2020#PulkitSamrat... New poster of #HaathiMereSaathi... Stars #RanaDaggubati... Directed by Prabu Solomon... Produced by Eros International... 2 April 2020 release in #Hindi, #Tamil and #Telugu. pic.twitter.com/GblkeppMrg
— taran adarsh (@taran_adarsh) February 22, 2020
हेही वाचा -२०० कोटींच्या कर्ज प्रकरणात बॉलिवूड निर्माता - दिग्दर्शकाला अटक
राणा आणि पुलकित व्यतिरिक्त श्रीया पिळगावंकरचीही या चित्रपटात भूमिका आहे.
या चित्रपटाचे केरळ, महाबळेश्वर आणि मुंबई यांसारख्या ठिकाणी शूटिंग करण्यात आले आहे. तसेच काही भाग हा थायलंड येथेही चित्रीत करण्यात आला आहे.
हिंदीशिवाय हा चित्रपट तमिळ आणि तेलुगू भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे. प्रभू सोलोमन या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. तर, ईरोस इंटरनॅशनल अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. २ एप्रिल २०२० रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल.
हेही वाचा -अभिनेत्यासह दिग्दर्शकाला चित्रपट गृहासमोरच मारहाण