मुंबई - मेघन मार्कल आणि प्रिन्स हॅरी यांच्या खणखणीत मुलाखतीनंतर ओप्रा विन्फ्रे तिच्या सुपर सोल या मालिकेसाठी काही मनोरंजक व्यक्तिमत्त्वाची मुलाखत घेण्यास तयार आहे. प्रियंका चोप्रा जोनास त्या सेलिब्रिटींमध्ये आहे ज्यांच्याबरोबर ओप्रा आगामी एपिसोडमध्ये काही इंटरेस्टिंग चर्चा करणार आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
प्रियंकासोबत ओप्राच्या पॉडकास्टचा प्रोमो अधिकृत यूट्यूब चॅनलवर आला आहे. अध्यात्म आणि विवाह या भिन्न विषयांबद्दल ही सुंदर मने कशी संवाद साधतात हे व्हिडिओ क्लिपमध्ये स्पष्ट केले आहे. एका क्लिपमध्ये, ओप्राने प्रियंकाला तिच्या आई डॉ. मधु चोप्रा यांच्या निक जोनासबद्दलची प्रतिक्रिया विचारली आहे. याचे उत्तरही प्रियंकाने रंजक पध्दतीने दिले आहे.
प्रियंकाला अनेक खासगी विषयावरही या मुलाखतीत ओप्राने विचारले आहे. निक जोनाससोबतचे लग्न हा विषय या चर्चेत महत्त्वाचा होता. या लग्नाचे काही किस्सेही प्रियंकाने मुलाखतीत सांगितले आहेत.
प्रियंका चोप्रा जोनासची ही सुपर सोलमधील ओप्रासोबतची मुलाखत शनिवारी, 20 मार्चपासून डिस्कव्हर + वर पाहता येईल.
हेही वाचा - 'अजीब दास्तां'चा टिझर : चार विचित्र कथांचा अनोखा कोलाज