ETV Bharat / sitara

'प्रेम पोयजन पंगा' या नवीन मालिकेच्या सेटवरील कलाकारांनी तयार केला खास आकाशकंदील - Prem poisan Panga latest news

ऐन दिवाळीमध्येच २८ ऑक्टोबरपासून 'प्रेम पॉयजन पंगा' ही नवीन मालिका सुरू होतेय. या मालिकेच्या सेटवर सुद्धा दिवाळी सणाची जय्यत तयारी करण्यात आली होती. मात्र, सगळ्यात लक्ष वेधून घेणारी गोष्ट होती ती म्हणजे 'प्रेम पॉयजन पंगा'च्या फोटोज नी बनवलेला एक खास आकाशकंदील !!

'प्रेम पॉयजन पंगा
author img

By

Published : Oct 28, 2019, 3:02 PM IST

दिवाळीनिमित्त आपण कायम घरात व घराबाहेर तेलाचे लहान दिवे लावतो. तसेच घराबाहेर आकाशकंदील लावला जातो. घराबाहेर रांगोळी काढून परिसर सुशोभित केला जातो. झी युवा वाहिनीवर ऐन दिवाळीमध्येच २८ ऑक्टोबरपासून 'प्रेम पॉयजन पंगा' ही नवीन मालिका सुरू होतेय. या मालिकेच्या सेटवर सुद्धा दिवाळी सणाची जय्यत तयारी करण्यात आली होती. मात्र, सगळ्यात लक्ष वेधून घेणारी गोष्ट होती ती म्हणजे 'प्रेम पॉयजन पंगा'च्या फोटोज नी बनवलेला एक खास आकाशकंदील.

prem_poison_panga
'प्रेम पॉयजन पंगा

गेली दोन महिने 'झी युवा' आणि 'कोठारे व्हिजन' या नवीन मालिकेवर काम करत आहे. तरुण मुलगा आणि त्याच्या प्रेमात पडलेली इच्छाधारी नागीण अशी एक वेगळी आणि मराठी इंडस्ट्री साठी पूर्णपणे नवीन गोष्ट घेऊन येत असल्याने कोठारे व्हिजनचे सर्वेसर्वा आदिनाथ कोठारे आणि महेश कोठारे जातीने या कार्यक्रमाच्या जडणघडणीत लक्ष देऊन आहेत. या दोघांनी किंवा सेट वर कोणत्याही कलाकारांनी गेली दोन महिने कसलीच सुट्टी घेतली नव्हती. मात्र दिवाळी आणि कार्यक्रम सुरू होण्याआधी सर्वानीच एक दिवसाची सुट्टी घेतली आणि परत सेटवर दिवाळी साजरी करण्यासाठी जमले . कार्यक्रमाचे नवीन कलाकार जोडी करण बेंद्रे आणि शरयू सोनवणे या दोघांनी मिळून शोचा फोटो असलेला आकाशकंदील बनवला.

याबद्दल मालिकेची नागीण जुई म्हणजेच अभिनेत्री शरयू सोनवणे ला विचारले असता ती म्हणाली "आम्ही सगळ्यांनी 'प्रेम पॉयजन पंगा'साठी भरपूर मेहनत घेतली आहे . ऐन दिवाळी मध्ये शो सुरू होत असल्याने असा एखादा आकाश कंदील आमच्या सेटच्या घरावर असावा असे वाटले म्हणून मी आणि करण दोघांनी मिळुन हा आकाश कंदील बनवला . ज्या प्रमाणे हा आकाश कंदील सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे तसाच आमचा कार्यक्रम सुद्धा सगळ्यांचे लक्ष वेधून घेईल अशी आशा करते "

आता आकाशकंदील जेवढा छान आहे तेवढीच मालिका सुद्धा छान आणि इंटरेस्टिंग निघाली तर प्रेक्षक ती नक्कीच उचलून धरतील यात अजिबात शंका नाही.

Intro:दिवाळीनिमित्त आपण कायम घरात व घराबाहेर तेलाचे लहान दिवे लावतो. तसच घराबाहेर आकाशकंदिल लावला जातो. घराबाहेर रांगोळी काढून परिसर सुशोभीत केला जातो. झी युवा वाहिनीवर ऐन दिवाळीमध्येच २८ ऑक्टोबर पासून 'प्रेम पॉयजन पंगा' ही नवीन मालिका सुरू होतेय. आणि या मालिकेच्या सेटवर सुद्धा दिवाळी सणाची जय्यत तयारी करण्यात आली होती. मात्र सगळ्यात लक्ष वेधून घेणारी गोष्ट होती ती म्हणजे 'प्रेम पॉयजन पंगा'च्या फोटोज नी बनवलेला एक खास आकाशकंदील !!

गेली दोन महिने 'झी युवा' आणि 'कोठारे व्हिजन' या नवीन मालिकेवर काम करत आहे. तरुण मूलगा आणि त्याच्या प्रेमात पडलेली इच्छाधारी नागीण अशी एक वेगळी आणि मराठी इंडस्ट्री साठी पूर्णपणे नवीन गोष्ट घेऊन येत असल्याने कोठारे व्हिजनचे सर्वेसर्वा आदिनाथ कोठारे आणि महेश कोठारे जातीने या कार्यक्रमाच्या जडणघडणीत लक्ष देऊन आहेत. या दोघांनी किंवा सेट वर कोणत्याही कलाकारांनी गेली दोन महिने कसलीच सुट्टी घेतली नव्हती. मात्र दिवाळी आणि कार्यक्रम सुरू होण्याआधी सर्वानीच एक दिवसाची सुट्टी घेतली आणि परत सेटवर दिवाळी साजरी करण्यासाठी जमले . कार्यक्रमाचे नवीन कलाकार जोडी करण बेंद्रे आणि शरयू सोनवणे या दोघांनी मिळून शोचा फोटो असलेला आकाशकंदील बनवला.

याबद्दल मालिकेची नागीण जुई म्हणजेच अभिनेत्री शरयू सोनवणे ला विचारले असता ती म्हणाली "आम्ही सगळ्यांनी 'प्रेम पॉयजन पंगा'साठी भरपूर मेहनत घेतली आहे . ऐन दिवाळी मध्ये शो सुरू होत असल्याने असा एखादा आकाश कंदील आमच्या सेटच्या घरावर असावा असे वाटले म्हणून मी आणि करण दोघांनी मिळुन हा आकाश कंदील बनवला . ज्या प्रमाणे हा आकाश कंदील सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे तसाच आमचा कार्यक्रम सुद्धा सगळ्यांचे लक्ष वेधून घेईल अशी आशा करते "

आता आकाशकंदील जेवढा छान आहे तेवढीच मालिका सुद्धा छान आणि इंटरेस्टिंग निघाली तर प्रेक्षक ती नक्कीच उचलून धरतील यात अजिबात शंका नाही.Body:.Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.