ETV Bharat / sitara

'लुडो' खेळ नशिबाचा की कौशल्याचा? राज्य सरकारला हायकोर्टाची नोटीस

author img

By

Published : Jun 5, 2021, 3:32 PM IST

Updated : Jun 7, 2021, 3:23 PM IST

'लुडो' या मोबाईल गेमविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. 'लुडो' हा खेळ कौशल्याचा नाही तर नशीबाचा खेळ म्हणून घोषित करावा अशी मुख्य मागणी याचिकेत केली आहे.22 जूनपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत.

'Ludo' mobile game
'लुडो' मोबाईल गेम

मुंबई - सर्वसामान्यांमध्ये खेळण्यात येणाऱ्या 'लुडो' या मोबाईल गेमविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. 'लुडो' हा खेळ कौशल्याचा नाही तर नशीबाचा खेळ म्हणून घोषित करावा अशी मुख्य मागणी याचिकेत केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने याचिकेची दखल घेत राज्य सरकारला नोटीस जारी केली आहे, तसेच 22 जूनपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.

'लुडो' खेळ सुप्रिम या मोबाईल ॲपवर पैसे लावून खेळण्यात येत असून जुगार प्रतिबंधक कायद्यातील कलम 3, 4 आणि 5 अन्वये हा गुन्हा आहे. त्यामुळे या मोबाईल ॲपच्या संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करत मनसेचे पदाधिकारी केशव मुळे यांनी व्ही.पी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मात्र, मुंबई पोलिसांनी यावर कोणतीही कारवाई केलेली नाही. त्याविरोधात केशव मुळे यांनी दंडाधिकारी न्यायालयात धाव घेतली. मात्र, कनिष्ठ न्यायालयाने 'लुडो' हा कौशल्याचा खेळ असल्याचं मान्य करत एफआयआर नोंदवण्याची मागणी फेटाळून लावली. या निकालाला याचिकाकर्त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देत ऍड.निखिल मेंगडे यांच्यामार्फत फौजदारी याचिका दाखल केली आहे.

सदर याचिकेवर न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती अभय अहुजा यांच्या सुट्टीकालीन खंडपीठासमोर व्हीसीमार्फत सुनावणी पार पडली. लुडोसारख्या खेळाचं रुपांतर जुगारामध्ये होत असून तरुण पिढी याकडे अधिक आकर्षित होत आहे. त्याचा समाजावर विपरीत परिणाम होत असल्याची बाब याचिकाकर्त्यांच्यावतीनं हायकोर्टात मांडण्यात आली. 'लुडो'चा डाव हा फासा (डाईस) टाकून त्यावर येणाऱ्या अंकानुसार खेळण्यात येतो. त्यामुळे हा कौशल्याचा खेळ नसून तो निव्वळ नशिबाचा खेळ आहे, असा युक्तिवाद याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी कोर्टात केला.
22 जूनपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.

हेही वाचा - HBD अशोक सराफ : रंगभूमीवरचा 'विदुषक' बनला चित्रपटसृष्टीचा 'मामा'!!

Last Updated : Jun 7, 2021, 3:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.