मुंबई - 'मिर्झापूर-२' या वेबसीरिजमुळे लोकप्रियतेच्या कळसावर पोहोचलेल्या अभिनेते दिवेन्दू शर्मा याच्या मते हिटच्या संख्येपेक्षा त्याला परफार्मन्स अधिक महत्त्वाचा वाटतो.
दिवेन्दूने सांगितले की, “प्रेक्षकांकडून मला इतके प्रेम मिळाल्याचा मला आनंद वाटतो. त्यांनी माझ्यावर खूप प्रेम केले आहे. मला फक्त चांगले काम करणे आणि लोकांचे मनोरंजन करण्याची इच्छा आहे. हिट चित्रपटांमुळे नाही तर, चांगल्या अभिनयासाठी लोकांनी मला ओळखावे अशी माझी इच्छा आहे. मी गुणवत्तेवर जास्त विश्वास ठेवतो. "
हेही वाचा -'बिच्छू का खेल'ची स्टार कास्ट गंगा आरतीला लावणार हजेरी
आपल्या ड्रीम प्रोजेक्टबद्दल तो म्हणाला, "मला 'फार्गो'सारखा एखादा शो करायचा आहे. आपल्या आजूबाजूला इतके चांगले प्रदर्शन घडत आहे. ही एक चांगला कलाकार होण्याची वेळ आली आहे."
हेही वाचा - जे तुम्ही नाहीत, ते दाखवण्यात मजा येते - दिव्येंदु शर्मा
दिव्यान्दूने 'प्यार का पंचनामा', 'टॉयलेट : एक प्रेम कथा', आणि 'बत्ती गुल मीटर चालू' यासारख्या चित्रपटांमध्येही आपली ओळख निर्माण केली आहे.