वॉशिंग्टन - अमेरिकेची माजी फर्स्ट लेडी मिशेल ओबामा यांनी नेटफ्लिक्सवरील आगामी डॉक्यूमेंटरी 'बिकमिंग'ची एक झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे. "यात पूर्णपणे मी आहे. 'पहिल्यांदा अनप्लग्ड'" असे त्यांनी लिहिलंय.
-
I’m thrilled to give you a sneak peek of BECOMING before it premieres on Netflix on May 6. This movie tells my story, from my childhood on the South Side of Chicago to my life today—and it celebrates the powerful stories of the people I met along the way. #IAmBecoming pic.twitter.com/jXqGTMRIZc
— Michelle Obama (@MichelleObama) May 4, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">I’m thrilled to give you a sneak peek of BECOMING before it premieres on Netflix on May 6. This movie tells my story, from my childhood on the South Side of Chicago to my life today—and it celebrates the powerful stories of the people I met along the way. #IAmBecoming pic.twitter.com/jXqGTMRIZc
— Michelle Obama (@MichelleObama) May 4, 2020I’m thrilled to give you a sneak peek of BECOMING before it premieres on Netflix on May 6. This movie tells my story, from my childhood on the South Side of Chicago to my life today—and it celebrates the powerful stories of the people I met along the way. #IAmBecoming pic.twitter.com/jXqGTMRIZc
— Michelle Obama (@MichelleObama) May 4, 2020
वर्ल्ड आयकॉन मिशेल ओबामा यांनी ट्विटरवर आगामी 'बिकमिंग' या नेटफ्लिक्सवरील डॉक्यूमेंटरीची झलक शेअर केली आहे. यात मिशेल यांच्या आयुष्यातील प्रसंग क्रमवार दाखवण्यात आले आहेत. त्यांच्या लहानपणापासून ते त्या आज ज्या स्थानावर आहेत तिथपर्यंतचा प्रवास यात पाहायला मिळेल.
मिशेल यांनी 'बिकमिंग'चा १ मिनीट ४९ सेकंदाचा ट्रेलर शेअर केला आहे. यात त्या आपल्या आयुष्यातील ८ वर्षे कशी होती याबद्दल समजावत आहेत.
त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलंय, ''शिकागोतील साऊथ साईडमधील माझ्या लहानपणापासून आतापर्यंतची गोष्ट ही फिल्म दाखवते. या शानदार प्रवासात माझी ज्यांच्याशी भेट झाली त्यांच्याबद्दलही ही फिल्म भाष्य करते.''
या व्हिडिओत मिशेल या आपल्या शाळेतील अनुभव, अडचणी आणि आव्हानांबद्दल बोलताना दिसत आहेत.
'बिकमिंग' या डॉक्यूमेंटरीचा ६ मे रोजी नेटफ्लिक्सवर प्रीमियर होणार आहे.