‘बिग ब्रदर’ हा जगातील अनेक देशांमधील भाषांमध्ये प्रसारित होतो आणि त्यामुळे हा जगातील सर्वात जास्त बघितला जाणारा रियालिटी शो आहे. नेदरलॅंडमधील 'एण्डेमोल' या संस्थेने ही कल्पना जगासमोर आणली. त्याचा हिंदी अवतार आहे ‘बिग बॉस’. याची प्रथम सुरुवात ३ नोव्हेंबर २००६ रोजी झाली होती. साधारण १४ वर्षांपूर्वी हिंदीमध्ये बिग बॉस हा शो सुरू झाला होता आणि त्याची लोकप्रियता पाहून तो कन्नड, बंगाली, तामिळ, तेलुगू, मल्याळम आणि मराठीमध्ये सुद्धा प्रसारित केला जातो. 'बिग बॉस मराठी’चा तिसरा सिझनसुद्धा लवकरच सुरु होतोय ज्याचे सूत्रसंचालन महेश मांजरेकर करताहेत.
बिग बॉस हा छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध रियॅलिटी शो आहे. हिंदी बिग बॉसचे आज पर्यंत १४ हंगाम झाले आहेत. यावर्षी ‘बिग बॉस’ हा ओटीटी वर सुरु झाला असून त्याला प्रतिसादही चांगला मिळत आहे. या पहिल्या ओटीटी पर्वाचे होस्टिंग करण जोहर करीत आहे. त्याचे सहा आठवडे झाल्यावर त्यातील काही सदस्यांसह तो टेलिव्हिजन वर नवीन सेलेब्रिटी सदस्यांसह प्रसारित होणार आहे. त्यावेळी सलमान खान सूत्रसंचालन करताना दिसेल. ‘बिग बॉस’ आणि सलमान खान हे नातं वर्षानुवर्षे घट्टच होत चाललंय. कलर्सवरील हा भारतातील सर्वात मोठा रियालिटी शो आहे ज्यात भिन्न स्वभावाच्या सेलिब्रिटीज बाहेरील जगाशी संबंध संपूर्णतः तोडून एका घरात राहतात.
यावर्षीच्या ‘बिग बॉस’ पर्वाचा प्रोमो बाहेर आलाय ज्यात बिग बॉसचे घरच गायब झालेले दिसत असून, सलमान खान आणि जेष्ठ अभिनेत्री व अजूनही प्रेक्षकांची लाडकी रेखा, शोधण्याच्या प्रयत्नात दिसत आहेत. यात सलमान खान जंगलात दिसत असून रेखाचा आवाज ऐकू येतोय. ते दोघे 'विश्वसुन ट्री' च्या साहाय्याने या गुढाची उकल करणार आहेत. घरात प्रवेश करण्यापूर्वी सदस्यांना जंगलात जावे लागणार आहे म्हणूनच प्रोमोशन चेतावणी देण्यात आली आहे, “संकट इन जंगल, फैलायेगा दंगल पे दंगल”.
‘बिग बॉस १५’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे, कलर्स वर.
हेही वाचा - ‘बिग बॉस ओटीटी’ चे को-होस्टिंग करण्यासाठी करण जोहरला हवाय 'हा' अभिनेता!!