ठाणे - चालकांनी पुरेशी झोप घेऊनच वाहने चालवावी . वेगावर नियंत्रण ठेवून वाहतुकीचे नियम पाळल्यास अपघातांवर नियंत्रण येईल, असा विश्वास सिने अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी ठाण्यातील वाहतूक नियंत्रण शाखेच्या रस्ता सुरक्षा अभियान निमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांनी व्यक्त केला. मुख्य टपाल कार्यालयाजवळील सिद्धी सभागृहात ठाण्यातील ट्रक तसेच रिक्षा टेंपो चालकांसाठी रस्ता सुरक्षा अभियान निमित्ताने ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते .
मालाची वाहतूक करताना प्रमाणापेक्षा जास्त मालाची वाहतूक करु नका. त्यामुळेही अपघाताला आमंत्रण दिले जाते. मर्यादित वेग ठेवून वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन केल्यास निश्चितपणे अपघात होणार नाहीत. तसेच वाहतूक नियम न पाळता पोलिसांशी विनाकारण हुज्जत घालणाऱ्या वाहनचालकांनीही आत्मपरीक्षण करण्याची खरी गरज आहे. पोलीस हे वाहतुकीच्या नियमाचा आग्रह धरून कारवाही करतात. या चागंल्या कारवाईला वाहनचालकांनीही प्रतिसाद दिला पाहिजे, असेही ते म्हणाले.
अभिनेते मोहन जोशी म्हणाले माझी ही ट्रांसपोर्ट कंपनी होती. वाहतूक नियमाचे चागंल्या प्रकारे पालन केल्यामुळेच कधीही अपघाताचा प्रसंग उदभवला नाही रात्रीच्या वेळी वाहन चालविताना वाहनांना रेडियम लावा. सीट बेल्ट लावा. खड्डे पाहूनच मागील वाहनाकडेही लक्ष द्या, असे अनेक सल्ले देऊन त्यांनी वाहनचालकांचे उद्बबोधन केले.
यावेळी वाहतूक पोलीस शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे, सिने अभिनेते मकरंद अनासपुरे, अभिनेते मोहन जोशी, ठाणे जिल्हा वाहतूक संघटनेचे विजय यादव, प्रकाश देशमुख आणि आदी पदाधिकारी तसेच १०० ते १५० वाहनचालक आणि वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस अधिकारी, कर्मचारी या कार्यक्रमावेळी उपस्थित होते.