मुंबई - कोरोना व्हायरस विरुध्दच्या लढाईत बॉलिवूड सेलेब्रिटी पुढाकार घेाना दिसत आहेत. 'आय फॉर इंडिया' या मोहिमेत अनेक कलाकार सहभागी झाले आहेत. याचाच भाग म्हणून अभिनेत्री माधुरी दीक्षितने एक सुंदर गाणे सादर केले आहे. आता माधुरीने गाणे सादर केलंय म्हणजे तुमच्या मनात ती नृत्य सादर करीत असेल असेच येणार ना? पण नाही. तिने हे गीत स्वतः गायले आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
'आय फॉर इंडिया' या मोहिमेत अंतर्गत कलाकार आपल्या सोशल मीडियावरुन कला सादर करीत लोकांना सहभागी होण्याचे आवाहन करीत आहेत. माधुरीने एक लोकप्रिय इंग्लिश गीत सादर केले आहे. विशेष म्हणजे तिचा मुलगा अरिन यांने माधुरीला पियानोवर उत्तम साथ दिली आहे. रविवारी याचे फेसबुकवर प्रसारण झाले.
माधुरी दीक्षितकडे गायनाचा गुण अंगभूत आहे. तिची आई स्नेहलता दीक्षित या शास्त्रीय गायिका आहेत. २०१४ मध्ये आलेल्या 'गुलाबी गँग' या सिनेमासाठी त्यांनी 'रंगी साडी गुलाबी चुनरीयां' हे गीत गायले होते. यात माधुरीनेही आईची गाण्यात साथ केली होती. आता तिने इंग्लिश गाण्याच्या रोमँटिक ट्रॅकवर सुंदर गीत सादर केले आहे.