ETV Bharat / sitara

मराठी बिग बॉस : माधव देवचके बनला घराचा कॅप्टन - Madhav Devchakke

बिग बॉस मराठीच्या घरात गेली काही दिवस तणाव होता. या आठवड्यात कॅप्टन कोण होईल याबद्दल चुरस होती. अखेर माधव देवचकेने बाजी मारली आणि तो कॅप्टन म्हणून निवडला गेला.

माधव देवचके
author img

By

Published : Jul 3, 2019, 11:49 PM IST

बिग बॉसमराठीच्या दूसऱ्या पर्वात या आठवड्यात अभिनेता माधव देवचके घराचा कॅप्टन बनला आहे. बिग बॉसने दिलेल्या सहनशक्ती टास्कमध्ये आपल्या खिलाडुवृत्तीने तो जिंकला आणि कॅप्टन बनला.

बिग बॉसच्या घरच्यांनी कॅप्टनपदासाठी वीणा जगताप आणि माधव देवचकेला उमेदवारी घोषित केली होती. या दोन्ही उमेदवारांसाठी स्विमींग पूलमधल्या खांबावर जास्तीत जास्त वेळ उभे राहून कॅप्टन बनण्यासाठीचे कार्य दिले होते. या कार्यात जास्त वेळ उभे राहून माधव जिंकला आणि त्याला कॅप्टनपद मिळाले.

माधव देवचकेच्या जवळच्या सूत्रांच्या अनुसार, "बिग बॉस मराठीच्या घरात गेल्या आठवड्यात झालेल्या तणावमय वातावरणानंतर आता घराला सर्वांचे समजून घेणारा आणि सर्वांशी जुळवून घेणारा कॅप्टन हवा होता. माधवच्या कॅप्टन बनण्याने घरातले वातावरण शांत राहण्यास नक्कीच मदत होईल."

या आठवड्यातल्या 'विकेन्डच्या वार'ला महेश मांजरेकरांनीही माधवच्या शांत स्वभावाचीच स्तुती केली होती. महेश मांजरेकर म्हणाले होते, "ही डोन्ट हॅव एनी बॅड ब्लड इन दि बॉडी. माधव खूप भोळा आहे . तो कोणालाच वाईट बोलत नाही. कोणालाच दुखवत नाही. हे खरं तर या गेममध्ये करून चालत नाही."

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.