मनुष्याने जंगलावर अतिक्रमण केल्यामुळे जंगलातील श्वापदं मनुष्य वस्तीत वावरू लागल्याच्या बातम्या समोर येताच असतात. मुंबईतील आरे कॉलोनी असो वा संजय गांधी नॅशनल पार्क जवळील मनुष्यवस्ती असो, तेथे बऱ्याचदा बिबट्याचा वावर होत असतो. जवळच असलेल्या फिल्म सिटीमध्येसुद्धा बिबट्या फिरताना अनेकांनी पाहिला आहे. नुकताच बिबट्याचा वावर एका मराठी मालिकेच्या सेटवर झाला आणि निर्मात्यांनी तेथे नायक नायिकेला बिबट्यापासून वाचवितो असा सीन शूट केला.
तर त्याचं झालं असं की तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या मालिकेचं चित्रीकरण सध्या नाशिक मध्ये सुरु आहे. नाशिकच्या आजूबाजूला घनदाट जंगल देखील आहे. संबंधितांना असे आढळून आले की या मालिकेचं चित्रीकरण सुरु होण्याआधी काही काळ सेटवर बिबट्याचा वावर होता. हा बिबट्या तेथील सीसीटीव्ही मध्ये कैद झाला. यावर मालिकेत एक सीन पण शूट करण्यात आला आहे, ज्यात सिद्धार्थ अदितीचं बिबट्यापासून रक्षण करतो आणि हा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. खरंतर अशी घटना ऐकून बरेच जण घाबरले पाहिजेत परंतु तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं ची संपूर्ण टीम न कचरता शूटिंग करीत आहे. चित्रीकरण सुरु होण्याआधी काही काळ सेटवर बिबट्याचा वावर असणे साहजिकच भीतीदायक आहे हे नक्की.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
झी मराठीवर तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं ही मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आली आणि या मालिकेला प्रेक्षकांचा भरगोस प्रतिसाद मिळतोय. सध्या एकत्र कुटुंब पद्धती लोप पावत आहे. विभक्त कुटुंब पद्धती फोफावत असताना पुन्हा एकत्र कुटुंबपद्धतीला नवसंजीवनी देणारी ही मालिका आहे असं प्रेक्षकांचं मत आहे, त्यामुळे त्यातील सगळीच पात्र प्रेक्षकांना भावत आहेत,
'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं' ही मालिका प्रसारित होते सोमवार ते शनिवार रात्री ९ वाजता झी मराठीवर.