मुंबई - अभिनेत्री कॅटरिना आणि सलमान खान यांचा 'भारत' चित्रपट येत्या ५ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरपासून ते गाण्यांपर्यंत आत्तापर्यंत प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. प्रदर्शनापूर्वी या चित्रपटाचे नवनवे प्रोमो तसेच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हे प्रोमो आणि व्हिडिओ पाहून चाहत्यांची चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे. आता कॅटरिनाच्या आणखी एका व्हिडिओला सोशल मीडियावर भरभरून लाईक्स मिळत आहेत.
कॅटरिनानेही तिच्या इन्स्टग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती 'भारत' चित्रपटाच्या संवादाचा सराव करताना दिसतेय. तिच्या आजुबाजुला काही कबुतरेदेखील उडताना दिसत आहेत. हा व्हिडिओ शेअर करुन कॅटरिनाने चाहत्यांना 'माझ्या मागे दिसणारे ते उडणारे कबुतर पाहा', असे म्हटले आहे.
कॅटरिनाला या चित्रपटाच्या संवादावर खूप मेहनत घ्यावी लागली. एका माध्यमाच्या मुलाखतीत बोलताना कॅटरिना म्हणाली होती, की 'या चित्रपटाचे काही संवाद हे प्रियांकासाठी लिहण्यात आले होत. मात्र, तिने माघार घेतल्यानंतर तिची भूमिका माझ्या वाट्याला आली. त्यामुळे या संवादाचा सराव करणे हे माझ्यासाठी आव्हानात्मक होते'.
कॅटरिनाने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ती खूपच साध्या लूकमध्ये दिसत आहे. चाहत्यांनी तिच्या या साधेपणाचे कौतुकही केले आहे. या चित्रपटात ती सलमान खानच्या 'कुमुद मॅडमसरची भूमिका साकारणार आहे. त्यांच्या जोडीला पहिल्यापासूनच प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आता 'भारत' चित्रपटाला देखील प्रेक्षक कसा प्रतिसाद देतात, हे पाहणे रंजक ठरेल.