ETV Bharat / sitara

छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिलेदारांची शौर्यगाथा ‘जय भवानी जय शिवाजी’ मधून! - छत्रपती शिवाजी महाराज

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'जय भवानी जय शिवाजी’ या मालिकेतून स्वराज्यासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिलेदारांची शौर्यगाथा उलगडली जाणार आहे.

जय भवानी जय शिवाजी
जय भवानी जय शिवाजी
author img

By

Published : Apr 8, 2021, 12:10 PM IST

मराठा इतिहासात छत्रपती शिवाजी महारांजांच्या गाथा स्फुरण चढवण्याऱ्या असतात. चित्रपट असो वा मालिका महाराष्ट्रात शिवाजी महाराजांवर आधारित कोणतेही कथानक प्रेक्षक आवडीने बघतात. प्रेक्षकांची हीच आवड लक्षात घेऊन स्टार प्रवाह एक नवीन शिवकालीन मालिका घेऊन येतेय जिचं नाव आहे ‘जय भवानी जय शिवाजी’. या मालिकेतून स्वराज्यासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिलेदारांची शौर्यगाथा उलगडणार आहे.

नेताजी पालकर, बाजीप्रभू देशपांडे, शिवा काशिद, जीवा महाला, तान्हाजी मालुसरे, कान्होजी जेधे, प्रतापराव गुजर, हंबीरराव मोहिते, मुरारबाजी देशपांडे, कोंढाजी फर्जंद या शूरवीरांची नावं आपल्याला परिचित आहेत. ‘जय भवानी जय शिवाजी’ ही मालिका या लवढय्यांच्या शौर्याला अर्पण असेल. छत्रपती शिवाजी महाराज हे नाव जरी उच्चारलं तरी उर अभिमानाने भरुन येतो. रयतेचा राजा कसा असावा याचा पायंडा छत्रपतींना रचला. आणि या जाणत्या राजाच्या स्वराज्य स्थापनेच्या स्वप्नपूर्ततेसाठी हजारो शिलेदारांनी जीव ओवाळून टाकला. याच शिलेदारांच्या शौर्याची गोष्ट सांगणारी ‘जय भवानी जय शिवाजी’ मालिका २ मे पासून रात्री १० वाजता स्टार प्रवाहवर सुरु होत आहे.

स्टार प्रवाहवर येणारी मालिका ‘जय भवानी जय शिवाजी’ मधून इतिहास जिवंत होताना दिसणार आहे. सुप्रसिद्ध अभिनेता भूषण प्रधान या मालिकेत छत्रपती शिवरायांची भूमिका साकारणार आहे. याविषयी सांगताना भूषण प्रधान म्हणाले, ‘छत्रपती शिवाजी महाराज साकारणं हे प्रत्येक अभिनेत्याचं स्वप्न असतं. या निमित्ताने माझेही स्वप्न पूर्ण होत आहे. मी बऱ्याच वर्षांपासून वाट पहात होतो की, आपल्याला कधी महाराजांची भूमिका साकारायला मिळेल. मला जबाबदारीचं भान नक्कीच आहे. त्यामुळे उत्सुकता आणि धाकधूक दोन्ही वाढली आहे. ही जबाबदारी पूर्ण करण्यासाठी माझ्यासोबतच संपूर्ण टीम मेहनत घेते आहे. लूकपासून सेटपर्यंत सगळं काटेकोरपणे पाहिलं जातंय. आमचे वर्कशॉप्स घेतले जात आहेत.’

छत्रपती शिवरायांच्या शिलेदारांची ही गोष्ट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि या भव्यदिव्य मालिकेविषयी सांगताना स्टार प्रवाहचे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले, ‘छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे अखंड महाराष्ट्राचच नव्हे तर आपल्या देशाचं आराध्य दैवत. महाराजांवर अनेक कथा, कादंबऱ्या, नाटक, मालिका आणि चित्रपट निर्माण झाले आहेत. यातून छत्रपती शिवाजी महाराजांची यशोगाथा आपण पाहिली आहे. ती वर्णावी तेवढी थोडीच आहे. आकाश ठेंगणं पडेल असे आपले छत्रपती शिवाजी महाराज. राजा असावा तर असा. या महान राजाच्या सेवेत अनेक रत्न होती ज्यांनी महाराजांच्या शब्दासाठी आपल्या देव देश आणि धर्मापायी प्राणांची आहुती दिली. अशा शिलेदारांची गोष्ट सांगणारी मालिका जय भवानी जय शिवाजी सादर करताना अभिमान वाटतो आहे. ही मालिका त्या सर्व शूर वीरांना अर्पण असेल. स्वराज्यासाठी लढलेल्या प्रत्येकालाच या मालिकेच्या निमित्ताने मानाचा मुजरा.’

स्टार प्रवाह प्रस्तुत या मालिकेची निर्मिती दशमी क्रिएशन्सची असून छत्रपती शिवरायांच्या शिलेदारांची भूमिका कोण साकारणार याची उत्सुकता नक्कीच वाढली आहे. २ मे पासून नवी मालिका ‘जय भवानी जय शिवाजी’, दररोज रात्री १० वाजता प्रसारित होणार आहे स्टार प्रवाहवर.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.