मुंबई - २०११ मध्ये ‘प्यार का पंचनामा’ या चित्रपटात अभिनेता दिव्येंदु शर्मा याने साकारलेली 'लिक्विड' ही व्यक्तीरेखा लोकांच्या कायम स्मरणात राहणारी ठरली. त्यानंतर त्याने काही वर्षे विनोदी भूमिकाही साकारल्या. त्यानंतर मिर्झापूर या मालिकेत त्याने साकारलेल्या गँगस्टर मुन्नाची भूमिका तो चतुरस्त्र अभिनेता आहे, हे सिध्द करणारी ठरली. अशा विविध भूमिका साकारण्यात आनंद मिळतो, असे त्याने म्हटले आहे.
दिव्येंदु आता 'बिच्छू का खेल' या आगामी वेब सीरिजमध्ये अखिल श्रीवास्तव ही व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे.
अभिनेता बनण्याच्या फायद्याबद्दल बोलताना दिव्येंदु म्हणाला, ''मी खऱ्या आयुष्यात एकाद्या गँगस्टरसारखा नाही. मुन्ना जसा आहे त्यापेक्षा मी बिल्कुल वेगळा आहे. मला वाटते एखाद्या माणसाला चित्रीत करणे मजेशीर असते, जे तुमच्या व्यक्तिमत्वापेक्षा पूर्ण वेगळे असते. आपण कोणीतरी दुसरे बनणे, एक अशी व्यक्तिरेखा अंगिकारणे, जे तुम्ही नाही ते दाखवणे, याची मजा वेगळीच असते.''
हेही वाचा - पूनम पांडेनंतर बीचवर 'विवस्त्र' धावणे मिलींद सोमणला पडणार महाग
तो पुढे म्हणाला, "ही सर्व पात्रं निभावणे ही माझ्यासाठी एक रंजक यात्रा ठरली आहे आणि मला माहीत नाही की माझ्या व्यक्तिमत्त्वात असणारी एखादी व्यक्तिरेखा मी कधी केली आहे. मला वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करण्याचा आनंद मिळाला. "
हेही वाचा - राहत फतेह अली खान यांनी नुसरत फतेह अली खान यांना वाहिली संगीतमय आदरांजली
अल्ट बालाजीच्या शो 'बिच्छू का खेल' विषयी बोलताना दिव्येंदु म्हणाला, "हा शो ऐंशीच्या दशकांसारखा आहे. याच्यात डॉयलॉगबाजी चालू आहे. त्यात खूप फिल्मी संगीत पार्श्वभूमी आहे. हा एक क्लासिक थ्रिलर आहे. ही एका मुलाची कहाणी आहे जो आपल्या वडिलांच्या मृत्यूचे रहस्य उलगडतो. मी याच्या शूटिंगमध्ये मजेदार वेळ घालवला. "