रायगड : 1986 साली दूरदर्शन वाहिनीवर गाजलेली नुक्कड मालिका आजही रसिकांच्या स्मरणात आहे. नुक्कड मालिकेतील सर्वच कलाकारांनी साकारलेल्या भूमिका या सर्वसामान्यांच्या जीवनावर आधारित होत्या. त्यामुळे त्यातील भूमिका कलाकारांनी अजरामर केल्या आहेत.
नुक्कडमध्ये घनुष या भिकाऱ्याची भूमिका सुरेश भागवत या कलाकाराने अजरामर साकारली होती. या भूमिकेचेही रसिकांनी कौतुक केले होते. सुरेश भागवत हे कलाकार आज अलिबाग येथे आपल्या कामानिमित्त आले असता त्यांना भेटण्याचा योग आला. यावेळी त्यांनी आपल्या भूमिका, मालिका, अनुभव आणि आता करीत असलेल्या कामांबाबत सवित्तर मुलाखत ईटीव्ही भारताला दिली.