मुंबई : 'इनसाइड एज'च्या नव्या सीझनच्या ट्रेलरने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. ट्रेलरमध्ये तनुज विरवानीचा स्टार क्रिकेटर 'वायू राघवन' ची व्यक्तिरेखा दाखवण्यात आली आहे, ज्याला भारतीय संघाच्या कर्णधारपदासाठी प्रबळ दावेदार बनण्यासाठी आपल्या खेळात सुधारणा करायची आहे.
भारत विरुद्ध पाकिस्तान संघर्ष ही शोमधील सर्वाधिक प्रलंबीत स्पर्धा बनत असल्याने, सहभागी होणाऱ्या सर्वांचीच दाणादाण उडवताना, तनुज आठवणींच्या जगात फिरतो आणि जुन्या दिवसांची आठवणी जागृत करून देतो.
1990 च्या दशकातील भारत विरुद्ध पाकिस्तान हाय-व्होल्टेज सामन्यांची आठवण करून देताना तनुज म्हणतो की, जगात कुठेही भारत विरुद्ध पाकिस्तान सामना खेळला गेला तरी मी तो पाहायचो. त्या दिवसांत टोरंटोमध्ये सहारा चषक स्पर्धा भरवली होती, हे तुम्हाला माहिती आहे. कॅनडा आणि भारत यांच्यातील वेळेच्या फरकाचा अर्थ असा होता की सामना पहाटेच्या वेळेस होईल.
कधी-कधी मी सकाळी ६ वाजेपर्यंत जागे राहायचो, दुसर्या दिवशी शाळेत जायचे असले तरी, मला रात्रभर झोप येत नव्हती कारण मला खेळाची आवड होती आणि सामना टीव्हीवर पाहण्यासाठी पूर्ण उत्साही होतो. खरं तर, मी हेल्मेट, क्रिकेटिंग गियर परिधान करायचो आणि माझा चेहरा तिरंग्यात रंगवत असे. मी दुसऱ्या दिवशी जागे राहूनही शाळेत जायचो.
'इनसाइड एज'चा सीझन 3 नेहमीपेक्षा चांगला दिसत असल्याने, यावेळी खेळ अधिक खास आणि रोमांचक होणार आहे. कारण तिसरा सीझन कसोटी क्रिकेटचे स्वरूप क्रिकेटरसिकांसाठी रणांगणात बदलणार आहे.
इनसाइड एज सीझन 3, करण अंशुमन निर्मित, 3 डिसेंबरपासून प्राइम व्हिडिओवर प्रवाहित होईल.
हेही वाचा - अमिताभ यांनी मुलगी श्वेता आणि नात नव्या यांचे 'केबीसी'च्या सेटवर केले स्वागत