ETV Bharat / sitara

हृतिकची आई पिंकी रोशनने सुशांतवर लिहिली पोस्ट

author img

By

Published : Oct 22, 2020, 8:28 PM IST

अभिनेता हृतिक रोशनची आई पिंकी रोशन यांनी दिवंगत सुशांतसिंह राजपूतबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी म्हटलंय, की त्याच्या मृत्यूबद्दलचे सत्य जाणून घेण्याची प्रत्येकाची इच्छा आहे, पण खरे कोणालाच बनायचे नाही. त्यांच्या या पोस्टवर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत.

Sushant
सुशांतसिंह

मुंबई - बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनची आई पिंकी रोशन यांनी दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी म्हटलंय, की त्याच्या मृत्यूबद्दलचे सत्य जाणून घेण्याची प्रत्येकाची इच्छा आहे, पण खरे कोणालाच बनायचे नाही. पिंकी यांनी आपल्या अधिकृत ट्विटरवरून लिहिलंय, "प्रत्येकाला सत्य जाणून घ्यायचे आहे, पण कुणालाही सत्य असणे आवश्यक वाटत नाही."

यासोबतच त्यांनी प्रेयर इज इज पॉवरफुल, युनिव्हर्स इज पॉवरफुल असे हॅशटॅगदेखील वापरले आहेत.

यापूर्वी ऑगस्टमध्ये त्यांनी 'जस्टिस फॉर सुशांत' वर पोस्टही शेअर केल्या होत्या.

सुशांत हा १४ जून रोजी मुंबईच्या वांद्रे येथील फ्लॅटमध्ये मृत अवस्थेत आढळला होता. त्याच्या मृत्यूची चौकशी करण्याची जबाबदारी सर्वप्रथम मुंबई पोलिसांवर सोपविण्यात आली होती, पण सुशांतचे वडील के. के. सिंग यांनी पटना येथे एफआयआर दाखल केल्यानंतर हे प्रकरण सीबीआयकडे सोपविण्यात आले. अंमलबजावणी संचालनालय आणि अंमली पदार्थ नियंत्रण विभागदेखील नंतर या तपासणीचा भाग झाला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.