प्रसिध्द रॅप गायक यो यो हनी सिंग अडचणीत सापडला आहे. त्याच्या विरोधात मोहालीच्या माटौर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे. त्याच्यावर 'मखना' या नव्या गाण्यात महिलांबद्दल उनुद्गार काढल्याचा आरोप आहे. त्याच्यासोबत 'मखना म्यूझिक अल्बम'चे निर्माते भूषण कुमार यांच्या विरोधातही तक्रार दाखल झाली आहे. ही कारवाई पंजाब महिला आयोगाने केली आहे.
हनी सिंग बराच काळ गाण्याच्या जगतापासून लांब गेला होता. 'मखना' या अल्बच्या माध्यमातून त्याने या क्षेत्रात पुनरागमन केले. मात्र महिलांबद्दल आक्षेपार्ह शब्द गाण्यात वापरल्यामुळे त्याला झटका बसला आहे. या गाण्यात गायिका नेहा कक्कडदेखील आहे. अद्याप तिचे नाव तक्रारीत नसले तरी तीदेखील अडचणीत येऊ शकते. महिला आयोगाने केलेल्या तक्रारीत नेहाचेही नाव आहे.
हनी सिंगच्या विरोधात माटौर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली. त्याच्या विरोधात २९४ आणि ५०६ या कलमांच्या अंतर्गत मामला दाखल करण्यात आलाय. पोलीस त्याला कधी अटक करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पंजाब महिला आयोगाच्या अध्यक्षा मनीषा गुलाटी यांनी पंजाबचे डीजीपी दिनकर गुप्ता यांना पत्र लिहून हनी सिंग व इतरांच्या विरोधात तक्रार दाखल करण्याची विनंती केली होती. यानुसार ही कारवाई झाली आहे.