ETV Bharat / sitara

कोरोना-काळातील धुळवड, स्टार प्रवाहवरील मालिकांमध्ये ! - serails

स्टार प्रवाहवरील जवळपास सगळ्याच मालिकांत होळीचा जल्लोष बघायला मिळणार आहे. 'सहकुटुंब सहपरिवार', 'आई कुठे काय करते', 'रंग माझा वेगळा' आणि 'फुलाला सुगंध मातीचा' या मालिकांत रंगपंचमीचे रंग उधळण्याबरोबरच नात्यांचे बदलते रंगही पाहायला मिळणार आहेत.

मालिकेच्या सेटवर धूळवड
मालिकेच्या सेटवर धूळवड
author img

By

Published : Mar 28, 2021, 3:10 PM IST

गेल्यावर्षी कोरोना उद्रेकामुळे होळी साजरी करता आली नाही. त्यामुळे यावर्षी ती दुप्पट उत्साहात साजरी करण्याचा अनेकांचा मानस होता. परंतु महाराष्ट्रात कोविड परिस्थिती पुन्हा बिघडू लागल्यामुळे यावर्षीही होळी घरातच साजरी करावी लागणार आहे. मराठी टेलिव्हिजन मालिकांनी बऱ्याच आधी होळी रंगपंचमीच्या भागांचे शूट उरकून घेतले असल्याकारणाने अनेक मालिकांमध्ये होळीची धमाल दाखविली जाणार आहे. स्टार प्रवाहवरील जवळपास सगळ्याच मालिकांत होळीचा जल्लोष बघायला मिळणार आहे. 'सहकुटुंब सहपरिवार', 'आई कुठे काय करते', 'रंग माझा वेगळा' आणि 'फुलाला सुगंध मातीचा' या मालिकांत रंगपंचमीचे रंग उधळण्याबरोबरच नात्यांचे बदलते रंगही पाहायला मिळणार आहेत.

‘रंग माझा वेगळा’ मध्ये दीपा कार्तिकची होळी
‘रंग माझा वेगळा’ मालिकेत दीपा आणि कार्तिकच्या नात्यावर गैरसमजांचे मळभ आहे. होळीच्या निमित्ताने या दोघांमधले गैरसमज दूर होतील असं वाटत असतानाच दोघांमधील दुरावा आणखी वाढला आहे. दीपा कार्तिकच्या नात्याचं भविष्य काय असेल हे मालिकेच्या पुढील भागांमध्ये उलगडेलच पण या संपूर्ण टीमने जल्लोषात होळी साजरी केली आहे.

होळीचे सेलिब्रेशन
होळीचे सेलिब्रेशन

हेही वाचा - ‘राजा’ आणि ‘रानी’ ‘जोडी’ने खेळणार होळी

'फुलाला सुगंध मातीचा'मध्ये रोमॅंटिक ट्रॅक
'फुलाला सुगंध मातीचा' मालिकेत होळीच्या निमित्ताने शुभम-कीर्तीवर एक रोमॅंटिक गाणं देखिल चित्रित करण्यात आलं आहे. परंतु शुभम-कीर्तीच्या नात्यात दुरावा आला आहे. ऐन सणाच्या दिवशीही शुभम कीर्तीकडून रंग लावून घेत नाही. शुभमचं हे वागणं कीर्तीला खटकतं. दोघांमधील हा दुरावा आणखी किती काळ राहणार हे मालिकेच्या पुढील भागांमधून पाहायला मिळेल.

'फुलाला सुगंध मातीचा'मध्ये रोमॅटिंक ट्रॅक

देशमुखांची आनंदाची होळी
‘आई कुठे काय करते’ मालिकेत देशमुख कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. परंतु कोरोनाचं सावट असल्यामुळे पूजाविधी कुटुंबाच्या उपस्थितीतच पार पडणार आहे. सध्या अनिरुद्ध-संजना प्रकरणामुळे घरात चिंतेचं वातावरण असलं तरी होळीचा सण मात्र एकत्रित येऊन साजरा करण्याचं सर्वांनी ठरवलं आहे. होळीच्या या पारंपरिक पूजेत संजनाला देखिल सहभागी करावं अशी अनिरुद्धची इच्छा असते. अनिरुद्धच्या अश्या वागण्याने अरुंधती दुखावली जाते.

हेही वाचा - ऋषी कपूर ने नीतू सिंग ला ‘असे’ केले होते प्रपोज!

होळीत आक्काचे कारस्थान
‘सहकुटुंब सहपरिवार’ मालिकेत अक्काच्या कारस्थानांपासून पश्या कुटुंबाचं रक्षण कसा करणार याची उत्सुकता असेल. यात होळीच्या सणाची धामधूम पाहायला मिळणार आहे. या जल्लोषात ढवळे मामी भांगेच्या नशेत अक्काच्या कारस्थानांचा पश्याकडे खुलासा करणार आहे. त्यामुळे होळीच्या जल्लोषासोबतच मालिकेत अक्काचा डाव उलटला जाणार आहे.

स्टार प्रवाहची होळी
स्टार प्रवाहची होळी
'मराठी परंपरा मराठी प्रवाह' हे ब्रीदवाक्य जपणाऱ्या स्टार प्रवाह वाहिनीवर होळी आणि धुळवडीच्या सणाचा जल्लोष पाहायला मिळणार आहे.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.