ETV Bharat / sitara

HBD Superstar Rajinikanth : हरभजनने रजनीकांत यांचा कोरला हुबेहुब टॅटू - Harbhajan singh inked rajnikanth tatoo

साउथ सुपरस्टार रजनीकांत आज त्यांचा ७१वा वाढदिवस (HBDSuperstarRajinikanth) साजरा करत आहेत. त्या निमित्ताने हरभजनने (Harbhajan Singh) रजनीकांत यांचा हुबेहुब टॅट आपल्या छातीवर कोरला आहे. छातीवरील टॅटूचा फोटो शेअर हरभजनने रजनीकांत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात.

rajnikanth tatoo
rajnikanth tatoo
author img

By

Published : Dec 12, 2021, 7:37 PM IST

Updated : Dec 12, 2021, 7:52 PM IST

मुंबई - साउथ सुपरस्टार रजनीकांत आज त्यांचा ७१वा वाढदिवस आहे. केवळ दक्षिण भारतातच नाही तर त्यांनी संपूर्ण जगभरात आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. जगभरातून रजनीकांत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा येत आहेत.

ट्विटरवर देखील (HBD Superstar Rajinikanth) असे ट्रेंड होत आहे. दरवर्षी रजनीकांत यांच्या वाढदिवसाला दक्षिण भारतात अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात. अनेक जण अनोख्या पद्धतीने त्यांना शुभेच्छा देत असतात. आज मात्र क्रिकेटर हरभजन सिंह याच्या अनोख्या शुभेच्छांनी सर्वांचे लक्ष वेधलं आहे. हरभजनने रजनीकांत यांचा हुबेहुब टॅटू आपल्या छातीवर कोरला आहे. छातीवरील टॅटूचा फोटो शेअर हरभजनने रजनीकांत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात.

रजनीकांतला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
'८० आणि ९०च्या दशकात तुमचेचं नाणे चालायचे. सिनेसृष्टीतील एकमेव सुपरस्टार लीडर रजनीकांत यांना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा', असं म्हणत हरभजनने फोटो शेअर केले आहे. मात्र, हरभजनने काढलेला टॅटू हा परमनंट आहे की टेम्पररी हे काही समजू शकलेलं नाही.

हेही वाचा - रामचरण आणि ज्यु. एनटीआरने दुर्लक्ष केल्याचा आलिया भट्टचा खुलासा

Last Updated : Dec 12, 2021, 7:52 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.