मुंबई - अभिनेता शक्ती कपूरने अभिनेता जॅकी श्रॉफला पहिले घर विकत घेण्यासाठी कसे राजी केले याचा खुलासा केला आहे. शक्ती कपूर आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देताना म्हणाला, ''जॅकीला नेहमी कारबद्दल आकर्षण होते. तेव्हा तो शहरात एका लहान घरात राहात होता. पण त्याने कार घ्यायचे ठरवले होते. इतकेच नाही तर सलमान खान आणि गोविंदाही याच ट्रेंडचा भाग होते.''
परंतु जॅकीच्या आईला चिंता होती आणि तिने शक्तीला घर खरेदी करण्यासाठी जॅकीला तयार करण्यास सांगितले.
शक्ती म्हणाला, ''त्याच्या आईला माहिती होते की जॅकी मला चांगला दोस्त मानत होता आणि त्यामुळे तो माझा शब्द मानेल. खरंतर जॅकी गरजू लोकांना पैसे दान करायचा, खास करुन रस्त्यावर राहणाऱ्या लोकांना तो मदत करायचा. त्यामुळे त्याचे हे धर्मार्थ कार्य थांबवणे थोडे मुश्किल काम होते.''
शक्ती आठवणी जागवत पुढे म्हणाला, ''मी त्याला डोक्यावर छप्पर असण्याचे महत्त्व समजावून सांगितले. पुढची गोष्ट मला आठवतंय की, जॅकीचा मला फोन आला. त्याने सांगितले की एक मोठे घर त्याने खरेदी केले आहे.''
शक्तीने 'सा रे गा मा पा लीट्ल चँप्स' च्या सेटवर जॅकीशी त्याच्या मैत्रीबद्दल सांगितले.
व्यावसायिकदृष्ट्या, जॅकी श्रॉफ आणि शक्ती कपूर यांनी अनेक चित्रपटात एकत्र काम केले आहे. यात 'हिरो', 'हलचल', आणि 'बंधन' सारख्या चित्रपटांचा समावेश आहे.