ETV Bharat / sitara

सोनाली कुलकर्णी करणार ‘क्राइम पॅट्रोल सतर्क: जस्टिस रिलोडेड’चे सूत्रसंचालन! - Crime Patrol will be hosted by Sonali Kulkarni

मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ‘क्राइम पॅट्रोल सतर्क: जस्टिस रिलोडेड’ मध्ये सूत्रसंचालिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. एखाद्या गुन्ह्याविरोधात तक्रार दाखल करणे किती महत्त्वाचे असते, याबाबतही ती जागृती करताना दिसेल.

Sonali Kulkarni
सोनाली कुलकर्णी
author img

By

Published : Apr 6, 2021, 3:30 PM IST

क्राइम पॅट्रोल हा देशभरातील गुन्हे उकलून काढणारा शो असून जवळपास गेली दोन दशकं प्रेक्षकांचे मनोरंजन करतोय. या शोमध्ये अधनं मधनं फॉरमॅटमध्ये बदल करण्यात येतो परंतु मनोरंजनाबाबत समायोजन केले जात नाही. या शो मध्ये निवेदकाची भूमिका महत्वाची असते कारण त्यातून अनेक सीन्समध्ये एकसंघपणा साधला जातो. आता मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ‘क्राइम पॅट्रोल सतर्क: जस्टिस रिलोडेड’ मध्ये सूत्रसंचालिकेच्या भूमिकेत दिसणार आहे.

सोनाली कुलकर्णी ‘क्राइम पॅट्रोल सतर्क: जस्टिस रिलोडेड’चे होस्टिंग करणार असून एखाद्या गुन्ह्याविरोधात तक्रार दाखल करणे किती महत्त्वाचे असते, याबाबतही ती जागृती करताना दिसेल. होस्ट म्हणून, सोनाली कुलकर्णी या भागात सतर्कतेचे इशारे आणि विचार प्रक्रियेत आवश्यक असलेल्या फेरबदलांबद्दल सांगणार आहे. हे कठीण असून विचार करण्यास प्रवृत्त करते.

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने आतापर्यंत अनेक हिंदी व मराठी चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका केल्या आहेत. ती आता क्राइम पॅट्रोल सतर्क या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहे. ‘जस्टिस रिलोडेड’ नावाच्या या आवृत्तीत व्यापक आणि गंभीर गुन्ह्याचे नाट्यमय सादरीकरण केले असून विविध आव्हानांमुळे त्यात रहस्य निर्माण होते. सोनाली प्रेक्षकांना बांधून ठेवताना दिसेल जेव्हा शेवटाला एका नव्या दृष्टीकोनातून त्याकडे पाहावे लागणार आहे.

या नव्या भूमिकेबद्दल सोनाली कुलकर्णी म्हणाली, “मी नुकतेच ‘क्राइम पॅट्रोल’ च्या टीमसोबत काम सुरु केले आहे. टीम खूप अप्रतिम आहे. अशा उत्साही आणि परिपूर्ण टीमसोबत काम करताना परफॉर्मरची उंची वाढते. माझ्यासाठी क्राइम पेट्रोल हा एक बॅटरीसारखा आहे. तो सर्वांना जागृत करण्याचा प्रयत्न करतो. लोकांनी अशा प्रकारच्या सापळ्यात अडकण्याऐवजी काय करावे, याबद्दल जबाबदार असले पाहिजे, यासाठी लोकांना सतर्क करण्याचे काम मी करणार आहे. चला सजग आणि जबाबदार बनूया.”

‘क्राइम पॅट्रोल सतर्क: जस्टिस रिलोडेड’ सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवर प्रसारित होत आहे.

हेही वाचा - दीपिका पदुकोणने अमिताभसोबत 'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकची केली घोषणा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.