मुंबई - पंजाबी गायिका सारा गुरपाल 'बिग बॉस सीझन -14' शोमधून घराबाहेर पडणारी पहिली स्पर्धक ठरली आहे. सोमवारी रात्री एलिमिनेशनच्या जनरल टास्कमध्ये सारा हिला निशांत सिंग, राहुल वैद्य, शहजाद देओल, एजाज खान, अभिनव शुक्ला आणि जान सानू यांच्यासह सर्वाधिक नामांकने मिळाली होती.
सीनिअर्स- हिना खान, गौहर खान आणि सिद्धार्थ शुक्ला यांना बिग बॉसकडून 'स्पेशल पॉवर' मिळालेली आहे. या सिनिअर्सकडे घरातून कोणालाही घालवून देण्याची पॉवर आहे. सुरुवातीला साराने राहुल, गौहर आणि निशांत यांची नावे हद्दपार करण्यासाठी घेतली आणि त्यानंतर सर्वांनी सारालाच बाहेर काढण्याचा निर्णय घेतला.
बिग बॉसमधील साराचा प्रवास खूपच छोटा होता, यात तिचे शहजाद देओलसोबत चांगले बॉन्डिंग असल्याचे दिसले होते.
शहनाज गिल, हिमांशी खुराना यांच्यानंतर बिग बॉसमध्ये सहभागी होणारी सारा ही तिसरी पंजाबी गायक ठरली आहे. पंजाबी गायक तुषार कुमारने दावा केला होता की त्याचे लग्न साराशी झाले होते, परंतु साराने याला नकार दिला, त्यानंतर ती चर्चेत आली होती.