मुंबई - अनेक दिवस लॉकडाऊनमध्ये घरी बंदिस्त असलेला आयुष्यमान खुराणा पुन्हा एकदा शूटिंग सेटवर पाहायला मिळाला. यावेळी त्याने चंदिगडमध्ये जाहीरातीचे शूटिंग केले. परत एकदा शूटिंगला सुरूवात झाल्यामुळे त्याने आपला आनंद व्यक्त केला आहे.
"इतक्या महिन्यांनंतर पुन्हा सेटवर येऊन शूटिंग करणं खूप छान झालं. आम्ही सगळे घरी आलो आहोत आणि आम्ही जे अगोदर काम करीत होतो ते परत सुरू करण्याची वाट पाहात आहोत,'' असे आयुष्यमान म्हणाला. "सर्व काही सुरळीत पणे सुरू करावे लागेल आणि सुरक्षेची सर्व खबरदारी घेऊन आम्ही सर्व जण बाहेर जाऊन काम करू.'' त्याचं गाव असलेल्या चंदीगडमध्ये शूटिंग साठी खूप मजा आली, असे आयुष्यमान म्हणाला.
हेही वाचा -प्रसिद्ध अभिनेते जगदीप काळाच्या पडद्याआड
"आम्ही लॉकडाऊनमध्ये गेल्यानंतर मी पहिल्यांदाच सेटवर पाय ठेवला आणि लोक नव्याने कशी तयारी करत आहेत हे मी पाहिलं. मी पूर्णपणे सहज काम करत होतो.'' तो पुढे म्हणाला. आयुषमान आपल्या कुटुंबासोबत आपल्या आईवडिलांबरोबर वेळ घालवण्यासाठी चंदीगडला राहात आहे. या अभिनेत्याने अलीकडेच सांगितले होते की, खुराणा कुटुंबाने एक नवीन घर खरेदी केले आहे.
खुराणा कुटुंबामध्ये आयुष्यमानचे आई-वडील पी. खुराना आणि पूनम, आयुषमान आणि त्याची पत्नी ताहिरा आणि भाऊ अपारशक्ती आणि त्याची पत्नी अकृती हे सदस्य आहेत. यांनी चंदीगडच्या सॅटेलाईट टाऊनमध्ये घर खरेदी केलं. आयुष्मान नुकताच शूजित सरकारच्या 'गुलाबो सीताबो' या डिजिटल रिलीजमध्ये अमिताभ बच्चनसोबत दिसला होता. आयुष्यमान खुराणा ड्रीम गर्ल लेखक-दिग्दर्शक राज शान्दिल्य यांच्यासोबत पुन्हा एकत्र येणार आहे. या जोडीनं सामाजिक संदेश देऊन एका मनोरंजनात्मक व्यावसायिक सिनेमासाठी एकत्र येण्याची तयारी केली आहे.