ETV Bharat / sitara

पडद्यावरील आणि पडद्यामागील कलाकारांची वाजणार ‘शिट्टी’, ‘किचन कल्लाकार’ मध्ये! - नवीन कुकरी शो

झी मराठीवरील प्रत्येक कार्यक्रम हा प्रेक्षकांचं अविरत मनोरंजन करतो आणि त्यातील कलाकार हे देखील प्रेक्षकांना आपलेसे वाटतात. असाच एक कलाकार म्हणजे संकर्षण कऱ्हाडे. एक अष्टपैलू व्यक्तिमत्व. तो अभिनेता, कवी, लेखक अशा अनेक भूमिका निभावताना प्रेक्षकांना दिसतो, पण आता संकर्षण सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसणार आहे.

Actor sankarshan karhade
Actor sankarshan karhade
author img

By

Published : Nov 25, 2021, 9:19 AM IST

मुंबई - लहान पडद्यावरील स्वयंपाकावरील कार्यक्रम प्रेक्षक चवीने पाहत असतात. त्यातच त्या कार्यक्रमांत सेलिब्रिटी असल्यास कार्यक्रमाची लज्जत अधिकच वाढते. आता मनोरंजनाची चव वाढणार आहे. कारण झी मराठी प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येणार एक धमाकेदार कुकरी शो, ‘किचन कल्लाकार’, ज्यात संकर्षण कऱ्हाडे दिसणार आहे सूत्रसंचालकाच्या भूमिकेत. हा पाककलेशी संबंधीत शो पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. या शोची रचना काय आहे संकर्षणसोबत जाणून घेऊ. या शो मध्ये कोण असणार याबाबत काहीच माहिती समोर आली नाही.

kitxhen kalakar
‘किचन कल्लाकार’
झी मराठीवरील प्रत्येक कार्यक्रम हा प्रेक्षकांचं अविरत मनोरंजन करतो आणि त्यातील कलाकार हे देखील प्रेक्षकांना आपलेसे वाटतात. असाच एक कलाकार म्हणजे संकर्षण कऱ्हाडे. एक अष्टपैलू व्यक्तिमत्व. तो अभिनेता, कवी, लेखक अशा अनेक भूमिका निभावताना प्रेक्षकांना दिसतो, पण आता संकर्षण सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसणार आहे.झी मराठीवर 'किचन कल्लाकार' हा नवीन कुकरी शोमध्ये संकर्षण सांगतो की, आता भल्या भल्या कलाकारांची शिट्टी वाजणार आणि मनोरंजनाची चव वाढणार. यावरून तर असंच दिसत की पडद्यावरील आणि पडद्यामागील कलाकारांचा या किचन मध्ये कस लागणार आहे. आता के कलाकार किचन मध्ये कसा कल्ला करणार हे पाहणं औत्सुक्याच ठरणार आहे. संकर्षण कऱ्हाडे ला ‘किचन कल्लाकार’ या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालकाच्या भूमिकेत पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

हेही वाचा - ‘मी होणार सुपरस्टार’ च्या महाअंतिम सोहळ्यात पिळगांवकर आणि सराफ कुटुंबीयांची खास उपस्थिती!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.