मुंबई - बॉलिवूडमधील काही कलाकार आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याचं पाहायला मिळालं. बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीचे वडील जगदीश पटानी आणि उत्तर प्रदेश वीज विभागाच्या दक्षता युनिटच्या दोन अन्य अधिकाऱ्यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
जगदीश पटानी उत्तर प्रदेशातील बरेली येथे राहतात. तेथील वीज कंपनीत अधिकारी असून काल त्यांच्या कार्यालयातील १०० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कोरोनाची चाचणी करण्यात आली. तेव्हा जगदीश पटानी यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, वीज कार्यालय चार दिवसांसाठी बंद करण्यात आले आहे. त्याचे निर्जंतुकीकरण केल्यानंतर सोमवारपासून हे कार्यालय पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. तसेच जगदीश पटानी यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.