ETV Bharat / sitara

MISSION MANGAL REVIEW: ताऱ्याप्रमाणे चमकणारं प्रत्येक पात्र, कलाकारांच्या मंगळ मोहिमेला यश

author img

By

Published : Aug 15, 2019, 6:21 PM IST

कलाकारांच्या मंगळ मोहिमेला यश

मुंबई - स्वातंत्र्य दिन, रक्षाबंधन आणि वीकेंड एकाच दिवशी आल्यानं प्रेक्षकांना इच्छा असते, एक असा सिनेमा पाहण्याची ज्याने देशाविषयीच्या अभिमानासोबतच मनोरंजनही होईल. हेच ओळखून अक्षय कुमारनं आपला मिशन मंगल चित्रपट आज प्रदर्शित केला. जाणून घेऊया, नेमका कसा आहे अक्षयचा हा चित्रपट...

चित्रपटाची कथा-

सिनेमाची कथा भारताच्या मंगळ मोहिमेवर आधारित आहे. २४ सप्टेंबर २०१४ ला इस्त्रोच्या महिला वैज्ञानिकांनी मंगळ मोहिमेसाठी सैटलाइट लॉन्च केलं होतं. ज्यानंतर भारत असा पहिला देश ठरला, ज्याने इतक्या कमी पैशात आणि पहिल्याच प्रयत्नात मंगळ मोहीम सफल करून दाखवली.

चित्रपट २०१० पासून सुरु होतो. इस्त्रोचे प्रसिद्ध वैज्ञानिक आणि मिशन मंगलचे डायरेक्टर राकेश धवन (अक्षय कुमार) इस्त्रोची वैज्ञानिक आणि प्रोजेक्ट डायरेक्टर तारा शिंदे (विद्या बालन) सोबत मिळून जीएसएलवी सी-३९ नावाच्या मिशनअंतर्गत एक रॉकेच लॉन्च करतात. मात्र, हे मिशन अपयशी ठरतं. ज्यानंतर राकेश आणि ताराला इस्त्रोच्या रखडलेल्या मार्स प्रोजेक्ट विभागात पाठवलं जातं. तिथे ताराच्या डोक्यात मिशन मंगलची कल्पना येते. या प्रोजेक्टसाठी राकेश आणि तारा इस्त्रो हेड विक्रम गोखले यांच्याशी बातचीत करतात. मात्र, यात मोठा अडथळा असतो, तो बजेट आणि नासामधून बोलवलं गेलेल्या दिलीप ताहिल यांचा विरोध.

राकेशच्या आग्रहामुळे आणि कमिटमेंटमुळे यासाठी परवानगी तर दिली जाते. मात्र, यासाठी त्याला ऐका गांधी (सोनाक्षी सिन्हा), कृतिका अग्रवाल (तापसी पन्नू), वर्षा पिल्ले (नित्या मेनन), परमेश्वर नायडू (शरमन जोशी) आणि एचजी दत्तात्रेय (अनंत अय्यर) यांसारख्या नवोदित वैज्ञानिकांची टीम दिली जाते. या सर्वांची विचारसरणी आणि वैयक्तिक आयुष्यातील समस्या यांमुळे यातील कोणीही हे मिशन साध्य करण्यासाठी विश्वासू नसतं. तारा शिंदे त्यांची विचारसरणी बदलून त्यांना मिशन मंगलसाठी संपूर्ण मनापासून काम करण्यासाठी प्रेरित करते आणि पुढे हा प्रवास कसा होतो हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा सिनेमा पाहावा लागेल.

दिग्दर्शन -

जगन शक्ती यांनी या सिनेमाच्या माध्यमातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं आहे. एका ऐतिहासिक घटनेवर आधारित या चित्रपटातून प्रेक्षकांची मनं जिंकण्यात ते यशस्वी ठरले आहेत. हा चित्रपट अक्षय कुमारच्या फिल्मी करिअरमधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरू शकतो, असा अंदाज चित्रपट व्यापार विश्लेषकांनी वर्तवला आहे. चित्रपट शेवटपर्यंत प्रेक्षकांची उत्सुकता कायम ठेवतो.

कलाकारांचे अभिनय -

सिनेमातील प्रत्येक कलाकारानं आपली भूमिका उत्तम पद्धतीनं निभावली आहे. अक्षयनं साकारलेल्या राकेश शिंदे यांच्या भूमिकेला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळताना दिसत आहे. चित्रपटातील त्याचे डायलॉग प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर केवळ हास्य न आणता प्रेक्षकांना टाळ्या वाजवण्यास भाग पाडतात. याशिवाय विद्यानं साकारलेली तारा शिंदेची भूमिकाही मनं जिंकून जाते.

Intro:Body:

ent

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.