ETV Bharat / entertainment

सनी देओलच्या 'बॉर्डर 2'चं अधिकृतपणे शूटिंग सुरू, वरुण धवन, दिलजीत दोसांझ आणि अहान शेट्टी लढणार युद्ध - BORDER 2 SHOOTING OFFICIALLY BEGINS

'बॉर्डर-2'चं शूटिंग सुरू झाले आहे. निर्मात्यांनी सोशल मीडियावर पहिली झलक शेअर केली आहे, ज्यामुळे चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे.

Sunny Deol starer Border 2
बॉर्डर 2 शूटिंग सुरू (ANI)
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Dec 25, 2024, 12:10 PM IST

मुंबई - सनी देओलच्या 'बॉर्डर' या ब्लॉकबस्टर चित्रपटानं 1997 साल गाजवलं होतं. या चित्रपटाचा सीक्वेल येईल याची प्रेक्षकांनी खूप काळापासून इच्छा बाळगली आहे. तब्बल 27 वर्षानंतर 'बॉर्डर 2' चित्रपट येणार हे निश्चित झालं आहे. आता या बहुप्रतिक्षित सिक्वेल 'बॉर्डर 2' चं अधिकृतपणे शूटिंग सुरू झालं आहे.

या वर्षाच्या सुरुवातीलाच सनी देओलनं 'बॉर्डर'मध्ये तो पुन्हा आपल्या भूमिकेत परतणार असल्याचं जाहीर केलं होतं. चित्रपटाच्या निर्मात्यांनी सनी देओल, वरुण धवन, दिलजीत दोसांझ आणि अहान शेट्टी अभिनीत 'बॉर्डर 2' चित्रपटाच्या शूटिंगची पहिली झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे. या चित्रपटाच्या शूटिंगमुळे चाहत्यांचा उत्साह वाढला आहे.

24 डिसेंबर रोजी निर्मात्यांनी 'बॉर्डर 2' च्या सेटवरील एक फोटो शेअर केला आणि चाहत्यांना सांगितलं की, चित्रपटाचं शूटिंग सुरू झालं आहे. हे पोस्टर शेअर करताना निर्मात्यांनी लिहिले आहे की, "सनी देओल, वरुण धवन, दिलजीत दोसांझ आणि अहान शेट्टी यांच्या मुख्य भूमिका असलेल्या अनुराग सिंग दिग्दर्शित या चित्रपटाची सुरुवात सिनेसृष्टीतील दिग्गज भूषण कुमार, जेपी दत्ता आणि निधी दत्ता यांनी केली आहे. हा चित्रपट म्हणजे आजवर कधीही न पाहिलेली भव्य देशभक्तीपर कलाकृती असेल. तुमच्या कॅलेंडरवर नोंद करुन ठेवा 'बॉर्डर 2' 23 जानेवारी 2026 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होईल."

1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धावर आधारित 'बॉर्डर 2' च शूटिंग या वर्षी नोव्हेंबरमध्ये सुरू होणार होतं. पण, लॉजिस्टिकमुळे प्रोडक्शन टीमनं ते पुढं ढकलण्याचा निर्णय घेतला. चित्रपट निर्माते जेपी दत्ता आणि त्यांची मुलगी निधी दत्ता यांनी त्यांच्या टीममार्फत शूटिंगसाठी परवानगी घेतली आहे. जम्मू-काश्मीर पर्यटन विभागाच्या अधिकाऱ्यानं याला दुजोरा दिला आहे.

अधिकाऱ्याने सांगितलं होतं की, 'ते काश्मीरमधील एलओसी आणि राजौरी-पुंछ सेक्टरजवळ चित्रपटाचं शूटिंग करण्याचा विचार करत आहेत. तसेच, डेहराडून, उत्तराखंडमध्ये अतिरिक्त दृश्ये निश्चित करण्यात आली आहेत. या टीमला जम्मू-काश्मीरमधील सर्व आवश्यक विभागांकडून मंजुरी मिळाली आहे. अधिकाऱ्यानं असेही सांगितलं की, प्रॉडक्शन टीम एका माजी आर्मी मेजरच्या सल्ल्यानं चित्रपटावर काम करत आहे, जेणेकरून युद्धाच्या घटना दाखवताना प्रेक्षकांमध्ये ऐतिहासिक अचूकता राखली जाईल.

'बॉर्डर 2' चे दिग्दर्शन अनुराग सिंग करत आहेत. 'बॉर्डर 2'पूर्वी अनुरागनं 'केसरी', 'पंजाब 1984', 'जट अँड ज्युलिएट' आणि 'दिल बोले हडिप्पा' सारखे चित्रपट केले आहेत. 13 जून 2024 रोजी 'बॉर्डर'ला 27 वर्षे पूर्ण झाल्यावर चित्रपटाची घोषणा करण्यात आली. निर्मात्यांनी त्याला 'भारतातील सर्वात मोठा युद्ध चित्रपट' घोषित केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.