मुंबई : अभिनेता वरुण धवन स्टारर बहुप्रतीक्षित ॲक्शन थ्रिलर चित्रपट 'बेबी जॉन' आज 25 डिसेंबर रोजी बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला आहे. या चित्रपटातून साऊथ अभिनेत्री कीर्ती सुरेशनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. 'बेबी जॉन' चित्रपटामध्ये वरुण धवन आणि कीर्ती सुरेश व्यतिरिक्त वामिका गब्बी, जॅकी श्रॉफ हे कलाकार देखील प्रमुख भूमिकेत आहेत. 'बेबी जॉन' चित्रपटाचं दिग्दर्शन कॅलिस यांनी केलं आहे. या चित्रपटाची निर्मिती साऊथ दिग्दर्शक ॲटली यांनी केली आहे. 'बेबी जॉन' हा थलपथी विजयच्या थेरी (2016) चा अधिकृत रिमेक आहे. आता या ॲक्शन-ड्रामात सलमान खानचा कॅमिओ असल्यामुळे अनेकजण या चित्रपटाला पाहण्यासाठी चित्रपटगृहांमध्ये जाईल, असं सध्या दिसत आहे. 'बेबी जॉन'च्या ट्रेलरमध्ये 'भाईजान'ची झलक दाखविण्यात आली आहे. दरम्यान या चित्रपटाचा फर्स्ट शो पाहिल्यानंतर प्रेक्षक सोशल मीडियावरून आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. चला तर बघूया कसा आहे, 'बेबी जॉन'चा रिव्ह्यू...
'बेबी जॉन'चा रिव्ह्यू : अनेक चाहत्यांनी एक्सवर या चित्रपटामधील काही व्हिडिओ आणि फोटो शेअर करून आपले रिव्ह्यू दिले आहेत. एका एक्स यूजर्न या चित्रपटातील सलमान खानच्या कॅमिओची झलक शेअर करत लिहिलं, 'सलमान खानसारख्या सुपरस्टारला कसे सादर करायचे हे फक्त साऊथच्या दिग्दर्शकांनाच माहीत आहे.' दुसऱ्या एका यूजरनं ॲटलीच्या कामचे कौतुक करत आपल्या पोस्टवर लिहिलं, 'ॲटलीनं उत्कृष्ट काम केलंय, सलमान खानसारख्या मेगास्टारला मोठ्या पडद्यावर कसे सादर करायचे हे त्याला माहीत आहे, अप्रतिम कॅमिओ कामगिरी.' आणखी एका यूजरनं 'बेबी जॉन'च्या शीर्षकाचे कौतुक करत लिहिलं, 'इतके स्टायलिश टायटल कार्ड मिळवणारा पहिला बॉलिवूड अभिनेता. 'बेबी जॉन'मधील वरुण धवनच्या या सिनेमॅटिक टॅलेंटबद्दल ॲटली अण्णा आणि कॅलिस सरांचे खूप खूप आभार.'
Only south Directors know how to present superstar like Salman Khan#BabyJohn #SalmanKhan pic.twitter.com/FJuFncJHtz
— 𝙳𝚛 𝙼𝚞𝚓𝚓𝚞 𝙺𝚑𝚊𝚗 (@MajesticMujju) December 24, 2024
BREAKING: Elon Musk switches up the like button on X for #SalmanKhan!The #SikandarTeaser hype is OFF THE CHARTS! Salmania is here, and it’s about #SalmanKhan’s epic cameo in #BabyJohn!#Sikandar #SquidGameSeason2 #UiTheMovie #TamannaahBhatia #SunnyLeone pic.twitter.com/qlmbd1bPyy
— Marry Christmas 𝕏 (@lalit41702) December 25, 2024
Megastar #SalmanKhan entry scene in #BabyJohn movie 🔥🔥💥
— अV🖤 (@BEINGashuuu) December 24, 2024
pic.twitter.com/NSDPtHVbNI
THIS MANNNN!!!! Action 🔥🤯
— Vandana Gaur (@vandanayash2021) December 25, 2024
ONE OF THE BEST ENTRY SCENE FOR SALMAN KHAN!! THE CENIMA WILL TURN INTO STADIUM !! 🥶
GET READY FOR " agent bhaijaan" 🔥🌋🥵#BabyJohn #SalmanKhan #Christmas #MerryChristmas #BabyJohnreview #Sikandar #SikandarTeaser #Sanatani pic.twitter.com/Zm0SrvSDo0
Agree or die
— BUNNY (@BabyJohnDec25) December 24, 2024
Best Title Card ever in the Bollywood cinema 🔥#VarunDhawan #BabyJohn
pic.twitter.com/MeYu6kB0Oa
First ever bollywood actor to get such a stylish title card, big thanks to @Atlee_dir anna & @kalees_dir sir for this cinematic brilliance for #VarunDhawan in #BabyJohn. pic.twitter.com/ylTipny9ae
— ✨Aayaan✨ (@BeingAayaan_Dvn) December 24, 2024
First ever bollywood actor to get such a stylish title card, big thanks to @Atlee_dir anna & @kalees_dir sir for this cinematic brilliance for #VarunDhawan in #BabyJohn. pic.twitter.com/ylTipny9ae
— ✨Aayaan✨ (@BeingAayaan_Dvn) December 24, 2024
'बेबी जॉन'ची कहाणी : 'बेबी जॉन'मध्ये वरुण धवन डीसीपी सत्या वर्मा आयपीएसच्या भूमिकेत दिसत आहे. या चित्रपटाची कहाणी सत्या वर्माभोवती फिरणारी आहे. बब्बर शेर या बलाढ्य राजकारण्याशी त्याचा संघर्ष होताना चित्रपटात दाखविण्यात आलं आहे. सत्य एका गुन्ह्यात राजकारण्याच्या मुलाची हत्या करतो. यानंतर याचा बदला म्हणून हा राजकारणी सत्याच्या कुटुंबाला ठार करतो, यात फक्त त्याची मुलगी जिवंत राहते. आपल्या मुलीला शत्रूंपासून वाचवण्यासाठी तो तिची मृत्यूची खोटी माहिती देतो आणि केरळमध्ये 'बेबी जॉन' म्हणून नवीन जीवन सुरू करतो. दरम्यान या चित्रपटामध्ये सान्या मल्होत्रा (कॅमिओ), जरा जायना, राजपाल यादव, बीएस अविनाश आणि शीबा चड्ढा हे देखील कलाकार आहेत.
हेही वाचा :