मुंबई - अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांनी काल महेश भट्ट यांच्या घरी ख्रिसमस साजरा केला. बॉलिवूडचे सगळे स्टार्स आपापल्या स्टाइलमध्ये हा सण साजरा करत केला. दरम्यान, शिल्पा शेट्टीनेही त्याच्या घरी ख्रिसमस सेलिब्रेशनची एक झलक चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. शिल्पानं आपल्या दोन्ही मुलांबरोबर हा दिवस खूप थाटात साजरा केला आहे. शिल्पानं वियान आणि समिशाबरोबरची झलक चाहत्यांना दाखवली आहे. व्हिडिओमध्ये सीक्रेट सांता ख्रिसमसचा दिवस साजरा करण्यासाठी शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राच्या घरी आला आहे. या व्हिडिओमध्ये सांता हा त्याच्याबरोबर काही भेटवस्तू देखील घेऊन आला आहे.
शिल्पा शेट्टी साजरा केला ख्रिसमसचा दिवस : सांताक्लॉज घरात प्रवेश करताच, शिल्पाची दोन्ही मुले त्याला पाहून उत्साहित होतात. तसेच शिल्पाच्या मुलगी ही खूप आनंदी होते. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये सांताक्लॉज हा शिल्पाच्या मुलांना खूप सारे गिफ्ट देतो. याशिवाय या मुलांना सांता हा काही सुंदर गोष्टी देखील सांगताना दिसतो. तसेच शिल्पा, राज त्यांच्या मुलांबरोबर एका सुंदर गाण्यावर डान्स देखील करताना दिसतात. आता शिल्पानं शेअर केलेल्या या व्हिडिओवर अनेकजण आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. काही चाहते शिल्पाला या विशेष दिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. याशिवाय अनेकजण या पोस्टच्या कमेंट विभागात सुंदर हार्ट शेअर करून शिल्पाच्या कुटुंबावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.
पॉर्नोग्राफी प्रकरणी राज कुंद्रा : दुसरीकडे, शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा पुन्हा एकदा पॉर्नोग्राफी प्रकरणी चर्चेत आला आहे. पोर्नोग्राफी प्रकरणी कायदेशीर पेचात अडकलेल्या राज कुंद्रानं नुकतेच यावर स्पष्टीकरण दिलंय. हे संपूर्ण प्रकरण शत्रुत्वाचे असल्याचं त्यानं म्हटलं आहे. या प्रकरणात जाणीवपूर्वक त्याला अडकवत असल्याचं त्यानं एका संवादादरम्यान सांगितलं आहे. राज कुंद्रा यांचे म्हणणे आहे की, त्याचे व्यावसायिक प्रतिस्पर्धी त्याच्याकडून सूड घेत आहेत. दरम्यान शिल्पा शेट्टीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती पुढं 'केडी द डेविल' या कन्नड चित्रपटामध्ये दिसणार आहे.
हेही वाचा :