मुंबई : राज्यासह देशभरात 'ख्रिसमस' (Christmas 2024) मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. ख्रिश्चन बांधवांसाठी ख्रिसमस सण खूप खास आहे. ख्रिसमसच्या दिवशी मित्र-मंडळींना केक भरवून आनंद साजरा करतात. ख्रिसमसच्या निमित्तानं अनेक ठिकाणी ख्रिसमस ट्रीसह आकर्षक विद्युत रोषणाई देखील करण्यात आली आहे. भारतात गोवा, महाराष्ट्र, तामिळनाडूसह अनेक राज्यांमध्ये ख्रिसमस सेलिब्रेशनचा उत्साह पाहायला मिळत आहे.
#WATCH | Mumbai, Maharashtra: Our Lady of Salvation Church decked up beautifully with lights, stars and Christmas cribs, on the occasion of #ChristmasEve pic.twitter.com/oTq9NdNRzs
— ANI (@ANI) December 24, 2024
मुंबईच्या माऊंट मेरी चर्चमध्ये ख्रिसमस सेलिब्रेशनचा उत्साह पाहायला मिळत आहे. माऊंट मेरी चर्च हे शहरातील सर्वात जुने चर्च आहे. ख्रिसमसच्या काळात येथे लोक मोठ्या संख्येनं प्रार्थना करण्यासाठी जमतात.
#WATCH | Mumbai, Maharashtra: Devotees sing hymns and carols at the Church Of Our Lady Of Victories, on the occasion of Christmas pic.twitter.com/BVbfAZqbC4
— ANI (@ANI) December 24, 2024
दिल्लीतील गोल दख्खाना येथे असलेल्या सेक्रेड हार्ट कॅथेड्रल चर्च रंगीबेरंगी दिव्यांनी सजवण्यात आलं आहे. चर्चसमोर विशाल ख्रिसमस ट्री लावण्यात आला आहे, जो दिल्लीतील जनतेचं लक्ष वेधून घेत आहे. ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला मोठ्या संख्येनं लोक चर्चला भेट देत आहेत.
#WATCH | Delhi's Sacred Heart Cathedral is all decked up with stars and a beautifully crafted Christmas crib#Christmas2024 pic.twitter.com/v0aYjvRSOb
— ANI (@ANI) December 25, 2024
पुद्दुचेरीमध्ये ख्रिसमसच्या निमित्तानं सेक्रेड हार्ट बॅसिलिका चर्चमध्ये मध्यरात्री सामूहिक प्रार्थनेसाठी लोक जमले होते.
#WATCH | Puducherry: People gathered for the midnight mass prayers at Sacred Heart Basilica Church on the occasion of Christmas. pic.twitter.com/bB4VdofDcv
— ANI (@ANI) December 25, 2024
गोव्यातील पणजी येथील अवर लेडी ऑफ द इमॅक्युलेट कन्सेप्शन चर्चला आकर्षक विद्युत रोषणाई करून सजवण्यात आलं. गोव्यात ख्रिश्चन लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळं येथे ख्रिसमस सण धुमधडाक्यात साजरा केला जातो.
#WATCH | Panaji, Goa: Our Lady of the Immaculate Conception Church decked up beautifully with lights, stars and Christmas cribs, on the occasion of #ChristmasEve pic.twitter.com/fVYAfa0q4s
— ANI (@ANI) December 24, 2024
केरळच्या एर्नाकुलममध्ये सेंट फ्रान्सिस ऑफ असिसी रोमन कॅथोलिक मेट्रोपॉलिटन चर्चही ख्रिसमसच्या निमित्तानं सुंदरपणे सजवण्यात आलं आहे.
ओडिशामध्ये ख्रिसमसच्या निमित्तानं अवर लेडी ऑफ मोस्ट होली रोझरी चर्चमध्ये मध्यरात्रीच्या सामूहिक प्रार्थनेसाठी लोक जमले.
#WATCH | Rameswaram, Tamil Nadu: People gather for the midnight mass prayers at the Our Lady of Most Holy Rosary Cathedral on the occasion of Christmas. pic.twitter.com/INX8RMMxPP
— ANI (@ANI) December 24, 2024
तामिळनाडूमध्ये ख्रिसमसच्या निमित्तानं अवर लेडी ऑफ मोस्ट होली रोझरी चर्चमध्ये मध्यरात्री सामूहिक प्रार्थनेसाठी लोक जमले. थुथुकुडी येथे थिरू इरुथया अंदावर चर्चच्या बाहेर मिरवणूक काढण्यात आली.
हेही वाचा