ETV Bharat / state

बीडमधील एक आरोपी मंत्रिमंडळात; एडिट आणि क्रेडिटचा फंडा आमच्याकडे नाही, संजय राऊतांचं टीकास्त्र - SANJAY RAUT ATTACKED ON GOVERNMENT

शाह आणि फडणवीसांचा व्हिडीओ एडिट करून व्हायरल केला जातोय का, राऊतांना असे विचारले असता ते म्हणाले, हे बघा एडिट, क्रेडिटचं हा फंडा आमच्याकडे नाही.

sanjay raut
संजय राऊत (Source- ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 25, 2024, 12:34 PM IST

मुंबई - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊतांनी अटल बिहारी वाजपेयींच्या जयंती निमित्त त्यांना आदरांजली वाहिलीय. विशेष म्हणजे संजय राऊतांनी अटल बिहारी वाजपेयींना अभिवादन करताना भाजपाच्या नेत्यांना टोलाही लगावलाय. "भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युती होती. त्यावेळी अटल बिहारी वाजपेयींचा शब्द बाळासाहेबांसाठी खूप महत्त्वाचा होता आणि बाळासाहेबांच्या शब्द अटल बिहारी वाजपेयींसाठी महत्त्वाचा होता. आज आमची भाजपासोबत युती नसली तरी अटल बिहारी वाजपेयी यांच्याविषयी आम्हाला आदर आहे. आज त्यांच्या जयंतीनिमित्त मी स्मरण करतो. अटल बिहारी वाजपेयी हे दुसरे नेहरू होते, असंही संजय राऊत म्हणालेत. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

नेहरूंवर टीका करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे : आज अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती आहे. देशभरात त्यांना अभिवादन केले जातेय. आमच्या मनात अटल बिहारी वाजपेयींविषयी खूप आदर आहे. अटल बिहारी वाजपेयींना दुसरे नेहरू म्हणून संबोधले जात होते. कारण त्यांनी नेहमी राजधर्माप्रमाणे काम केले. राजधर्माच्या आदर केलाय. नेहरूंनी अटल बिहारी वाजपेयींना नेहमीच मार्गदर्शन केले, पण आज नेहरूंच्यावरती काही जण टीका करीत आहेत, त्यांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे, असा टोला संजय राऊतांनी सत्ताधाऱ्यांना लगावलाय.

महाराष्ट्र दारूडा करणार : पुढे बोलताना लाडकी बहीण योजनेवरून खासदार संजय राऊतांनी सरकारवर टीका केली. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सरकारने लाडक्या बहिणींना 1500 रुपये दिले. मात्र त्या 1500 रुपयांमध्ये लाडक्या बहिणींचे नवरे हे दारूच्या आहारी गेलेत. दारुडे झाले. 1500 रुपयांमध्ये हे सरकार महाराष्ट्राला दारुडा करीत आहे. मी ऐकतोय की, सरकार अनेक योजनांसाठी दारूची दुकानं वाढवणार आहे. ड्राय डे कमी करणार आहे. त्यामुळे सरकार महाराष्ट्राला दारुडा करणार आहे. काही राज्यात दारूचे दुकान वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे. राज्यातील घराघरात दारू डिलिव्हरी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. 1500 रुपयांच्या माध्यमातून हे सरकार लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना, मुलांना, भावांना बेवडे करण्याचा प्रयत्न करीत आहे. अजित पवार यांच्यासारखा नेता दारूच्या माध्यमातून महसूल वाढवत असतील, तर हे महाराष्ट्रासाठी अत्यंत गंभीर आहे. आणि कलंक आहे. अजित पवार हे यशवंतराव चव्हाण आणि शाहू, फुले, आंबेडकर यांचे नाव घेऊन राजकारण करतात, ते त्यांनी त्यांचे नाव घेणे थांबवावे आणि त्यांच्या होर्डिंगवरती यांचे फोटो लावणे थांबवावे, अशी टीकाही संजय राऊतांनी अजित पवारांवर केलीय.

1500 रुपये देऊन मतं विकत घेतली : आता राज्याचा महसूल वाढवण्यासाठी दारूचे परवाने देण्यात येणार आहेत किंवा परवाना देण्यामध्ये वाढ करण्यात येणार आहे. परंतु यामुळे दारू पिणाऱ्यांची, बेवड्यांची संख्या वाढेल. निवडणुकीपूर्वी लाडक्या बहीण योजनेत कोणते निकष न लावता 1500 रुपये देऊन मतं विकत घेतली. आणि आता सरकार आल्यानंतर निकष आणि नियम लावले जात आहेत. यामुळे या सरकारने लाडक्या बहिणींची फसवणूक केलीय. 1500 रुपये देऊन घराघरात हे लोकं दारुडे निर्माण करीत आहेत. महागाईने उच्चांक गाठलेला आहे. जी लाडकी बहीण 1500 रुपयांमध्ये भाजी आणायला जाते. ती मंडईतून खाली पिशवी घेऊन येत आहे. 1500 रुपयांमध्ये काही येत नाही, पण आता महसूल वाढवण्यासाठी अजब प्रकार सुरू केला जाणार आहे. दारूचे परवाने देण्याचा प्रकार अत्यंत गंभीर असल्याची टीका संजय राऊतांनी सरकारवर केली.

बीडमधील आरोपी मंत्रिमंडळात : बीड आणि परभणीतील घटना खूप धक्कादायक आहे. या दोन घटनेमुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था तीनतेरा वाजलेत. या दोन घटनांमुळे राज्यातील जनतेचा सरकार आणि प्रशासनावरती विश्वास नसल्याचं दिसतंय. बीडमध्ये एका जिल्ह्यात राष्ट्रपती शासन लावावे, अशी तिथली परिस्थिती आहे. पण आपल्या घटनेत अशी तरतूद नाही. बीड आणि परभणीतील कुटुंबाचा आक्रोश सरकारच्या कानावर ऐकू जात नाही. इथे कधीही भडका उडू शकतो. परंतु तिकडे मुख्यमंत्री अन् गृहमंत्री का जात नाहीत? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केलाय. सरकारचे मंत्री तिकडे कशासाठी जात आहेत? परभणीतील घटनेतील आरोपी हे पोलिसांत आहेत आणि बीडमधील जो आरोपी आहे तो मंत्रिमंडळात आहे. मात्र हे सरकार अन्य आरोपींचा शोध घेत आहे. बीडमधील जनता रस्त्यावर उतरली तर मोठा भडका उडू शकतो. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या लाडक्या धनुभाऊसह बीडचा आढावा घ्यावा. पण ते तिकडे जात नाहीत. बीडचा आरोपी हा सरकारच्याच मंत्रिमंडळात असल्याची टीका संजय राऊतांनी धनंजय मुंडेंचे नाव न घेता केलीय.

एडिटची देण तुमची : दरम्यान अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा व्हिडीओ एडिट करून व्हायरल केला जात आहे का, असा प्रश्न संजय राऊत यांना विचारला असता, हे बघा एडिट आणि क्रेडिटचं हा फंडा आमच्याकडे नाही. ही टेक्नॉलॉजी आमच्याकडे अद्यापपर्यंत आलेी नाही. हे तुम्ही वापरता आणि एडिटची देण देशाला तुम्ही दिलेली आहे. खोटे गुन्हे दाखल करणे, खोटी चौकशी करणे, केंद्रीय तपास यंत्रणाचा चौकशीचा ससेमिरा पाठीमागे लावणे, व्हिडीओ एडिट करणे ही सर्व तुमची देण आहे. त्यातलं आम्हाला काय कळत नाही, असा पलटवारही संजय राऊतांनी भाजपावर केलाय.

हेही वाचाः

बीडमध्ये राष्ट्रपती राजवट लावावी अशी परिस्थिती; लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का, संजय राऊतांचा सवाल - SANJAY RAUT ON DEVENDRA FADNAVIS

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.