ETV Bharat / sitara

Prathamesh Parab and Elena Durgarian Dance : अर्मेनियन डान्सर एलेना दुर्गारियनसोबत थिरकतोय मराठमोळा कलाकार - Marathmola artiste Prathamesh Parab

मराठी चित्रपट आशयघनतेबरोबरच मनोरंजनही करतात. आपल्याकडे विनोदी चित्रपटांची मोठी परंपरा आहे. या कारणांमुळे इतर भाषिक रंगकर्मीसुद्धा मराठी चित्रपटांकडे आकृष्ट होताना दिसतात. (Prathamesh Parab and Elena Durgarian Dance) आतातर आंतरराष्ट्रीय कलाकारही मराठीची कास धरताना दिसताहेत. बॉलिवूडमध्ये नाव कमवायला आलेली एलेना दुर्गारियन चक्क एका मराठी गाण्यात नाच करताना दिसणार आहे.

प्रथमेश परबचा लीना दुर्गारियनसोबत डान्स
प्रथमेश परबचा लीना दुर्गारियनसोबत डान्स
author img

By

Published : Feb 14, 2022, 7:55 AM IST

मुंबई - मराठी चित्रपट आशयघनतेबरोबरच मनोरंजनही करतात. आपल्याकडे विनोदी चित्रपटांची मोठी परंपरा आहे. या कारणांमुळे इतर भाषिक रंगकर्मीसुद्धा मराठी चित्रपटांकडे आकृष्ट होताना दिसतात. (Elena Durgarian Dance) आतातर आंतरराष्ट्रीय कलाकारही मराठीची कास धरताना दिसताहेत. (Prathamesh Parab) बॉलिवूडमध्ये नाव कमवायला आलेली एलेना दुर्गारियन चक्क एका मराठी गाण्यात नाच करताना दिसणार आहे. तिच्या सोबतीला आहे मराठमोळा प्रथमेश परब. हिंदी सिनेसृष्टीत स्थिरस्थावर होऊ पाहणारी अर्मेनियन डान्सर एलेना दुर्गारियनची पावलंही मराठीच्या दिशेनं वळली आहेत. पदार्पणातच तिनं 'एक नंबर' धमाल नाचो साँगवर परफॅार्म करत तमाम रसिकांना घायाळ करण्याची योजना आखली आहे. (Number one. Super) मिलिंद कवडे यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या 'एक नंबर, सुपर' या आगामी मराठी चित्रपटात प्रथमेश परबसोबत एलेनाचा धमाल डान्स परफॅार्मंस पहायला मिळणार आहे.

प्रथमेश परबचा लीना दुर्गारियनसोबत डान्स
प्रथमेश परबचा लीना दुर्गारियनसोबत डान्स

वरुण यांनीच हे गाणं संगीतबद्धही केलं आहे

या चित्रपटाच्या निमित्तानं एलेनानं प्रथमच मराठी चित्रपटात काम केलं आहे. दिग्दर्शक मिलिंद कवडे यांनी एलेनाला मराठीत आणण्याची किमया साधली आहे. (Prathamesh Parab Marathi film) एलेना-प्रथमेशवर शूट करण्यात आलेलं गाणं गीतकार जय अत्रे यांनी लिहिलं असून, वरुण लिखते, मुग्धा कऱ्हाडे आणि कविता राम यांनी गायलं आहे. वरुण यांनीच हे गाणं संगीतबद्धही केलं आहे. एलेना ही रशियातील प्रसिद्ध डान्सर आहे. परदेशासोबतच भारतातही तिचे खूप चाहते आहेत. जबरदस्त लुक, आकर्षक डान्स, लक्षवेधी देहबोली, गोड स्मित, हॉट व्यक्तिमत्व आणि अनोख्या नृत्यशैलीसाठी एलेना यु ट्यूबवर खूप पॅाप्युलर आहे.

प्रथमेश परबचा लीना दुर्गारियनसोबत डान्स
प्रथमेश परबचा लीना दुर्गारियनसोबत डान्स

एलेना आणि प्रथमेशचे धडाकेबाज परफॅार्मंस

लक्ष वेधून घेत उत्सुकता वाढवणारं 'एक नंबर. सुपर' असं टायटल असणाऱ्या या चित्रपटाची निर्मिती महेश शिवाजी धुमाळ, जितेंद्र शिवाजी धुमाळ आणि मिलिंद कवडे यांनी धुमाळ प्रॉडक्शनच्या बॅनरखाली आऊट ऑफ द बॉक्स फिल्म्सच्या सहयोगानं केली आहे. या चित्रपटात प्रथमेश परब मुख्य भूमिकेत झळकणार असून, एलेनासोबत नाचतानाही दिसणार आहे. 'एक नंबर...सुपर' या चित्रपटातील 'माझे तुकडे तुकडे व्हतील गं असा मुखडा असलेल्या गाण्यावर एलेना आणि प्रथमेशचे धडाकेबाज परफॅार्मंस प्रेक्षकांना पहायला मिळणार असून राहुल संजीर यांनी कोरिओग्राफी केली आहे.

प्रथमेश परबचा लीना दुर्गारियनसोबत डान्स
प्रथमेश परबचा लीना दुर्गारियनसोबत डान्स

वरुण यांनी लिहिलेलं गाणं खूप सुंदर असून

या गाण्यासाठी एलेनाची निवड करण्याबाबत मिलिंद कवडे म्हणाले की, “मला नेहमीच प्रेक्षकांना काहीतरी नवीन द्यायला आवडतं. 'माझे तुकडे तुकडे व्हतील गं...' या गाण्यासाठी एलेनाची निवडही याच विचारातून करण्यात आली आहे. या निमित्तानं आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या एका पॅाप्युलर डान्सरची मराठी सिनेसृष्टीत एंट्री झाली आहे. वरुण यांनी लिहिलेलं गाणं खूप सुंदर असून, त्यावर बांधलेली चाल त्याही पेक्षा सुरेख असून अबालवृद्धांना थिरकायला लावणारी आहे.”

आकाश कोळी आदी कलाकारांच्या भूमिका आहेत

दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळणाऱ्या मिलिंद कवडे यांनीच ‘एक नंबर. सुपर' या चित्रपटाची कथा व पटकथाही लिहिली असून, संजय नवगिरे यांनी संवादलेखन केलं आहे. या प्रथमेशसोबत मिलिंद शिंदे, गणेश यादव, निशा परूळेकर, अभिलाषा पाटील, आयली घिया, ऋषिकेश धामापूरकर, अक्षता पाडगावकर, प्रणाली संघमित्रा ढावरे, सुमित भोक्से, सुनिल मगरे, हरिष थोरात, आकाश कोळी आदी कलाकारांच्या भूमिका आहेत.

हेही वाचा - आज उत्तराखंडमध्ये विधानसभेसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान; ६३२ उमेदवारांचे भवितव्य ठरणार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.