ETV Bharat / sitara

बॉलिवूड सोडलेल्या 'या' अभिनेत्रीने साधला पंतप्रधान मोदींवर निशाणा, ट्विट व्हायरल - Zaira Wasim in news

जायराने एका ट्विटद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अभिनेता अक्षय कुमार यांना टोला लगावला.

Zaira Wasim comment on Delhi Violence, Delhi Violence reaction, Zaira Wasim comment PM Modi, जायरा वसीमने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर साधला निशाणा, Zaira Wasim in news, Zaira Wasim latest news
बॉलिवूड सोडून गेलेल्या 'या' अभिनेत्रीने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर साधला निशाणा, ट्विट व्हायरल
author img

By

Published : Feb 29, 2020, 10:05 AM IST

मुंबई - बॉलिवूडच्या फक्त २ चित्रपटात अभिनय केल्यानंतर बॉलिवूड सोडणारी अभिनेत्री जायरा वसीम पुन्हा एकदा आपल्या ट्विटमुळे चर्चेत आली आहे. सामाजिक आणि राजकीय मुद्यांवर सध्या ती आपली मतं व्यक्त करत असते. सध्या देशभरात दिल्ली हिंसाचारावर बरेचजण आपले मत व्यक्त करत आहेत. कलाविश्वातही बऱ्याच कलाकारांनी या विषयावर आपली मतं मांडली आहेत. झायरानेही एक ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.

जायराने ट्विटरवर एका ट्विटद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अभिनेता अक्षय कुमार यांना टोला लगावला. मागच्या वर्षी अक्षय कुमारने नरेंद्र मोदी यांची मुलाखत घेतली होती. या मुलाखतीची बरीच चर्चा झाली होती. या मुलाखतीदरम्यान अक्षयने मोदींना 'तुम्ही आंबा कसा खाता?', असा प्रश्न विचारला होता. याच प्रश्नाचा संदर्भ घेऊन जायराने हे ट्विट केलं आहे.

  • The question should’ve been “Aapko raat ko sukoon ki neend kaise aajati hai”. NOT “Aap aam kaise khate hai”. 💔

    — Zaira Wasim (@ZairaWasimmm) February 28, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा -दिल्ली हिंसाचाराप्रकरणी १२३ गुन्हे दाखल; ६३० जणांना अटक

आपल्या ट्विटमध्ये तिने लिहिलंय, की 'तुम्हाला रात्री शांत झोप कशी लागू शकते? असा प्रश्न विचारायला हवा होता. तुम्ही आंबे कसे खाता, असा नाही..' जायराचे हे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

मागच्या वर्षी देखील तिने जम्मू काश्मिरच्या परिस्थितीवर ट्विट केले होते. 'कलम ३७०' विरोधात तब्बल ६ महिन्यानंतर जायराने सोशल मीडियावर मोठी पोस्ट लिहली होती. तिच्या या पोस्टनंतरही बरीच चर्चा झाली होती.

हेही वाचा -"दिल्लीमध्ये इतकी मोठी सुरक्षा यंत्रणा असताना दंगल होतेच कशी?"

जायराने बॉलिवूडमध्ये 'दंगल' चित्रपटातून पदार्पण केले होते. या चित्रपटात तिने कुस्तीपटू गिता फोगटच्या बालपणीची भूमिका साकारली होती. त्यानंतर ती 'द स्काय इझ पिंक' आणि 'सिक्रेट सुपरस्टार' या चित्रपटात झळकली. त्यानंतर तिने धर्माचे कारण देऊन बॉलिवूडला रामराम ठोकला.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.