ETV Bharat / sitara

राजकीय पक्ष लॉन्च करणार नाही, रजनीकांत यांची माहिती - Rajinikanth's political party

अभिनेता रजनीकांत आपल्या राजकीय पक्षाचे लॉन्चिंग करणार नाही. तब्येत बरी नसल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला आहे. आपल्या ट्विटरवरुन त्यांनी ही घोषणा केली आहे.

Rajinikanth
रजनीकांत
author img

By

Published : Dec 29, 2020, 12:28 PM IST

Updated : Dec 29, 2020, 12:47 PM IST

चेन्नई - गेले काही वर्षे सुपरस्टार रजनीकांत तामिळनाडूच्या राजकारणात सक्रिय होणार अशी चर्चा आपण ऐकत आलो आहोत. या पार्श्वभूमीवर त्यांनी रजनीकांत मक्कल मंड्राम या राजकीय पक्षाची घोषणाही केली होती. या पक्षाचे लॉन्चिंग ३१ डिसेंबरला करण्याचा निर्णय त्यांनी रजनी मक्कल मंडरम या संघटनेतील पदाधिकाऱ्यांशी चर्चा करुन घेतला होता. मात्र तब्येतीच्या कारणास्तव त्यांनी आपल्य पक्षाचे लॉन्चिंग रद्द केले आहे. रजनीकांत यांनी आपल्या ट्विटरवरुन त्यांनी ही घोषणा केली आहे.

Rajinikanth
रजनीकांत यांचे पत्र

रजनीकांत यांना रुग्णालयातून मिळाली होती सुट्टी

हैदराबादमध्ये रजनीकांत यांच्या अण्णात्थे चित्रपटाच्या शुटिंग सेटवर काही क्रू मेंबर्सना कोरोनाची लागण झाल्यानंतर हे सुटिंग थांबवण्यात आले होते. त्यानंतर क्वारंटाईनमध्ये असलेल्या रजनीकांत यांना रक्तदाबाचा त्रास जाणवू लागल्यानंतर ते हैदराबादच्या अपोलो रुग्णालयाद दाखल झाले होते. दोनच दिवसापूर्वी त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे.

रजनीकांत मक्कल मंड्रामचे लॉन्चींग रद्द

रजनीकांत यांचा ७० वा वाढदिवस चाहत्यांनी जोरदार साजरा केला. त्याचवेळी त्यांनी ३१ डिसेंबरला रजनीकांत मक्कल मंड्राम या पक्षाचे लॉन्चिंग होणार असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे तामिळनाडूच्या राजकारणाला कोणते नवे वळण मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. मात्र आता तरी हे लॉन्चिंग पुढे ढकलले गेल्याचे दिसत आहे.

गेली दोन वर्षे रजनीकांत राजकारणात सक्रिय आहेत. परंतु, अधिकृतपणे त्यांनी अद्याप राजकारणात प्रवेश केलेला नाही. यापूर्वी अभिनेते आणि राजकीय नेते कमल हासन (मक्कल निधी माईम पक्षाचे अध्यक्ष) आणि रजनीकांत यांनी तमिळनाडूच्या कल्याणासाठी एकत्र येऊन काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती.

विधानसभेच्या 234 जागा लढणार असल्याची केली होती घोषणा

रजनीकांत यांनी डिसेंबर 2017 मध्ये तामिळनाडूत राजकीय पक्ष स्थापन करत असल्याची घोषणा केली होती. विधानसभेच्या 234 जागा लढणार असल्याचेही ते म्हणाले होते. मात्र, लोकसभा नि़वडणुकांमध्ये रजनीकांत यांनी सहभाग घेतला नव्हता. तर सद्य परिस्थीती पाहता, तामिळनाडूमध्ये सध्या सत्ताधारी अण्णा द्रमुक भाजपाच्या मदतीने राज्यातील आपली सत्ता कायम राखण्यास प्रयत्नशील आहे. तर विरोधी पक्ष असलेल्या द्रमुकनेही सत्तेत येण्यासाठी करण्यासाठी कंबर कसली आहे.

रजनीसोबत एकत्र काम करण्याची कमल हासन यांची इच्छा

पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत उतरणार असल्याचे अभिनेता कमल हासनने म्हटले आहे. यासाठी सुपरस्टार रजनीकांत यांचे सहकार्यही घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मक्कल सुधी माइम (एमएनएम) पक्षाच्या वतीने कमल हासन यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले होते की, पुढच्या वर्षी मी विधानसभा निवडणूक लढवणार आहे.रजनीकांत यांच्याशी ते राजकारणाविषयी चर्चा करीत आहेत. त्यांनी राजकीय भूमिकेबाबत निर्णय घ्यायला हवा, असेही ते म्हणाले.

हेही वाचा -वाढदिवस विशेष : जेजुरीचा 'खंडोबा' आहे रजनीकांतचे कुलदैवत

Last Updated : Dec 29, 2020, 12:47 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.