मुंबई - अभिनेता विवेक ओबेरॉयने मोठ्या जल्लोषात गणरायाचे स्वागत केले होते. आता ५ दिवसानंतर मोठ्या भक्तीभावाने त्याने लाडक्या गणरायाला निरोप दिला. गणरायाची पुजाअर्चना झाल्यानंतर आपल्या कुटुंबियासोबत त्याने गणेश विसर्जन केले.
विवेकच्या घरी ५ दिवसांच्या गणेशाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती. ५ दिवस मोठ्या उत्साहाने विवेक आणि त्याच्या कुटुंबीयांनी गणरायाचं अगत्य केलं.
- View this post on Instagram
#vivekoberoi with family today for #ganesh visarjan #viralbhayani @viralbhayani
">
विवेकशिवाय इतरही बॉलिवूड कलाकारांनी गणरायाची स्थापना केली होती. त्यापैकी शिल्पा शेट्टी, सलमान खान यांनी आपल्या गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला आहे.
- View this post on Instagram
Beautiful family picture of #vivekoberoi for their #ganpati visarjan #viralbhayani @viralbhayani
">
विवेक ओबेरॉयच्या गणेश विसर्जनदरम्यानचे बरेच फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.