मुंबई - 'जब तक है जान' या गाण्याच्या आयकॉनिक शोले सीक्वेन्सची पुनरावृत्ती करणार्या इराणी महिलेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हेमा मालिनीने शोलेमध्ये बसंती बनून डाकूंच्या समोर केलेल्या नृत्याचे रिक्रियशन यात केलेले दिसते. उपस्थित लोकांनी बसंतीला प्रोत्साहन दिल्याचे व्हिडिओत दिसते.
-
I hope this tweet somehow finds its way to the Indian Twitter. This is the Iranian generation that grew up with Indian movies and on top of all the absolute Bollywood gem that was Sholay (1975), which is the film that these party goers are humorously reenacting. Made my day 👏👏 https://t.co/9mKkR5WcYj
— Kaveh Abbasian (@KavehAbbasian) March 28, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">I hope this tweet somehow finds its way to the Indian Twitter. This is the Iranian generation that grew up with Indian movies and on top of all the absolute Bollywood gem that was Sholay (1975), which is the film that these party goers are humorously reenacting. Made my day 👏👏 https://t.co/9mKkR5WcYj
— Kaveh Abbasian (@KavehAbbasian) March 28, 2021I hope this tweet somehow finds its way to the Indian Twitter. This is the Iranian generation that grew up with Indian movies and on top of all the absolute Bollywood gem that was Sholay (1975), which is the film that these party goers are humorously reenacting. Made my day 👏👏 https://t.co/9mKkR5WcYj
— Kaveh Abbasian (@KavehAbbasian) March 28, 2021
या गाण्यात नृत्य करणाऱ्या महिलेचे नाव कळू शकलेले नाही. पण हेमा मालिनीने सादर केलेल्या नृत्याच्या स्टेप्स ती उत्तमरित्या वापरताना दिसते. धर्मेंद्रला ज्या पध्दतीने बांधलेले असते तसेच एका व्यक्तीला यात बांधलेले आहे आणि अमजद खानची व्यक्तीरेखाही एकजण साकारताना दिसतोय.
फिल्म मेकर कवेश अब्बासियन याने हा व्हिडिओ ट्विट केला असून यात तो म्हणतो की, ''इराणी पिढी भारतीय सिनेमा बघत मोठी झाली आहे. शोले हे बॉलिवूडचे रत्न आहे. या पार्टीत शोलेचा सीन रिक्रियट केला आहे. खात्री आहे की भारतीय लोकांना हा व्हिडिओ आवडेल.''
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कवेश अब्बासियन यांनी आपली आनंद व्यक्त केला आहे.
हेही वाचा - जान्हवी आणि खूशी बहिणी म्हणजे, ''तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून करमेना''!!