मुंबई - ज्येष्ठ अभिनेत्री सुरेखा सिक्री यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. आज (शुक्रवारी) सकाळच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांना तब्बल तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. त्या 75 वर्षांच्या होत्या.
उत्तर प्रदेशच्या रहिवासी असलेल्या सुरेखा यांनी नॅशनल स्कुल ऑफ ड्रामामधून (एनएसडी) पदवीचे शिक्षण घेतले. यांना 1989मध्ये संगीत नाट्य अकादमीचा पुरस्कारही मिळाला होता. त्यांचे वडील वायू सेनेत तर त्यांच्य आई प्राध्यापिका होत्या. त्यांचे लग्न हेमंत रेगे यांच्याशी झाले होते. राहुल सिकरी हे त्यांचे चिरंजीव आहेत. राहुल हे मुंबईत राहतात. ते आर्टिस्ट आहेत.
सुरेखाने आपल्या करीअरची सुरुवात नाटकातून केली होती. त्यानंतर त्या मालिका आणि चित्रपटांकडे वळल्या. त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात 1978मध्ये राजकीय ड्राम्यावर आधारित 'किस्सा खुर्ची का' या चित्रपटातून केली. त्यांना तीन वेळा बेस्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिकेसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. सुरेखा यांना कलर्सवाहिनीवरील बालिका वधु या मालिकेतील कल्याणी देवीच्या भूमिकेसाठी स्मरणात ठेवले जाईल.
कोरोनामुळे अनेक महिने चित्रीकरण बंद होते. यानंतर जेव्हा चित्रीकरणास परवानगी देण्यात आली त्यावेळी सरकारकडून मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या होत्या. यात वृद्ध कलाकरांना शुटींगमध्ये सहभाग घेण्यावाचून मनाई करण्यात आली होती. यामुळे सुरेखा यांना शुटींगमध्ये सहभाग घेता आला नाही.