ETV Bharat / sitara

जबरदस्त मराठी थ्रिलर 'ग्रे'चा ट्रेलर लॉन्च, वैभव तत्ववादीची थक्क करणारी अॅक्शन - अभिषेक जावकर दिग्दर्शित 'ग्रे'

अभिनेता वैभव तत्ववादी लवकरचं 'ग्रे' नामक एक रहस्यमय थरारक चित्रपट घेऊन आपल्या भेटीस येत आहे. स्पृहा जोशी आणि अभिषेक जावकर यांनी लिहिलेला ‘ग्रे’ हा चित्रपट अभिषेक जावकर यांनीच दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर नुकताच व्हायरल झाला.

जबरदस्त मराठी थ्रिलर 'ग्रे'चा ट्रेलर लॉन्च

author img

By

Published : Oct 1, 2021, 1:40 PM IST

मराठी चित्रपटसृष्टीत विविधांगी विषय हाताळले जातात. अल्पावधीतच आपल्या अभिनयाने रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अभिनेता वैभव तत्ववादी लवकरचं 'ग्रे' नामक एक रहस्यमय थरारक चित्रपट घेऊन आपल्या भेटीस येत आहे. स्पृहा जोशी आणि अभिषेक जावकर यांनी लिहिलेला ‘ग्रे’ हा चित्रपट अभिषेक जावकर यांनीच दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर नुकताच व्हायरल झाला असून त्यास प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद देखील मिळत आहे.

दिग्दर्शक अभिषेक जावकर दिग्दर्शित 'ग्रे' चित्रपटात वैभव 'सिद्धांत' नामक एका युवकाची भूमिका साकारत आहे. ग्रे ”ही सिद्धांतच्या कुटुंबाच्या दुर्दैवी बादल्याच्या बदल्याची कथा आहे. या चित्रपटात वैभव तत्त्ववादी समवेत पल्लवी पाटील, मयुरी देशमुख, शरद पोंक्षे, अविनाश नारकर, पुष्कराज चिरपूटकर असे एकापेक्षा एक अव्वल कलाकार या चित्रपटात पाहायला मिळणार आहेत. विजय भाटे आणि केवल वाळुंज यांच्या संगीताची जोड या चित्रपटास लाभली आहे.

रेड बल्ब मूव्हीज आणि का का किंडल एंटरटेनमेंट निर्मित, अभिषेक जावकर दिग्दर्शित 'ग्रे' हा चित्रपट येत्या १ ऑक्टोबरला झी5 प्रीमियरवर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

हेही वाचा - खुशखबर! रामोजी फिल्म सिटी 8 ऑक्टोबरपासून पुन्हा होणार खुली; पाहायला मिळणार 'ही' मनोरंजनाची ठिकाणे

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.