मुंबई - अभिनेता टायगर श्रॉफ आणि हृतिक रोशन यांची मुख्य भूमिका असलेल्या 'वॉर' चित्रपटाची सध्या चर्चा सुरू आहे. बॉलिवूडचे दोन अॅक्शन हिरो एकाच चित्रपटात सोबत झळकणार असल्यामुळे चाहत्यांनाही या चित्रपटाबद्दल उत्सुकता आहे. विशेष म्हणजे टायगर आणि हृतिक एकमेकांना भिडताना दिसणार असल्यामुळे त्यांची जुगलबंदी पाहण्यासाठी चाहते आतुर आहेत. या चित्रपटात टायगर श्रॉफचा एकट्याचा अडीच मिनिटांचा अॅक्शन सिनही पाहायला मिळणार आहे. याचा खुलासा चित्रपटाचे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांनी केला आहे.
टायगरने अवघ्या अडीच मिनिटांचा अॅक्शन सिन कोणताही रिटेक न घेता एकाच शॉटमध्ये पूर्ण केला आहे. हा अॅक्शन सिन प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा आहे, असेही सिद्धार्थ आनंद यांनी सांगितले.
हेही वाचा-'गँग्स ऑफ वासेपूर': १०० बेस्ट चित्रपटांच्या यादीत समावेश झालेला एकमेव भारतीय सिनेमा
'सी यंग ओह' (sea young Oh) यांनी या अॅक्शन सिनला कोरिओग्राफ केलं आहे. त्यांनी यापूर्वी हॉलिवूडच्या 'एज ऑफ अल्ट्रॉन' (Age of Ultron) आणि 'स्नोपिअर्सर' (snowpiercer) या चित्रपटांमध्येही अॅक्शन सिनचं कोरिओग्राफ केलं आहे. टायगरसाठी त्यांची विशेष निवड करण्यात आली होती.
टायगरच्या अॅक्शन सिन्सची चाहत्यांमध्ये एक विशेष क्रेझ पाहायला मिळते. 'बागी', 'बागी २', 'हिरोपंती' आणि 'स्टूडंट ऑफ द ईयर २' या चित्रपटांमध्ये त्याचे अॅक्शन सिन्स पाहायला मिळाले. त्यामुळे अॅक्शन हिरो म्हणूनच त्याची ओळख निर्माण झाली आहे.
हेही वाचा-'थप्पड'मध्ये पवैल गुलाटीची एन्ट्री, तापसीनं शेअर केली पोस्ट
'वॉर'मधल्या अॅक्शन सिन्ससाठी देखील त्याने बरीच मेहनत घेतली आहे. त्याच्या लूकवरही त्याने विशेष लक्ष दिले आहेत. त्यामुळेच अडीच मिनिटांचा सिन तो एकाच शॉटमध्ये पूर्ण करू शकला, असे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांनी सांगितले.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
'वॉर'चं शूटिंग ७ देशांमधील १५ वेगवेगळ्या ठिकाणी झालं आहे. २ ऑक्टोंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. यश राज फिल्म्सच्या बॅनरखाली हा चित्रपट तयार झाला आहे. हिंदी, तेलुगू आणि तमिळ भाषेत हा चित्रपट प्रदर्शित होईल.
हेही वाचा-दुसऱ्या दिवशी 'ड्रीम गर्ल'च्या कमाईत कमालीची वाढ, जाणून घ्या आकडे