ETV Bharat / sitara

भाईजानसमोर 'खिलाडी'चं तगडं आव्हान, पुढच्या वर्षी 'ईद'च्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार चित्रपट - Akshay kumar upcomming films

सलमान खानचे चित्रपट आणि ईदचा मुहूर्त हे त्याच्यासाठी यशाचं गमक ठरलं आहे. दरवर्षी ईदच्या मुहूर्तावर भाईजानचा चित्रपट हमखास प्रेक्षकांच्या भेटीला येतो. मात्र, यावेळी त्याच्या चित्रपटाची टक्कर अक्षय कुमारच्या चित्रपटाशी होणार आहे.

भाईजानसमोर 'खिलाडी'चं तगडं आव्हान, पुढच्या वर्षी 'ईद'च्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार चित्रपट
author img

By

Published : Nov 2, 2019, 9:34 PM IST

मुंबई - बॉलिवूडमध्ये एकापाठोपाठ एक चित्रपट तयार होत असल्यामुळे बॉक्स ऑफिसवर चित्रपटांची तगडी टक्कर पाहायला मिळते. सध्या अक्षय कुमारचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करण्यात यशस्वी ठरत आहेत. नव्या दमाच्या कलाकारांनाही मागे टाकत त्याचे चित्रपट एकापाठोपाठ एक विक्रम रचत आहेत. पुढच्या वर्षीदेखील त्याचे बरेच चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. त्यामुळे ईदच्या मुहूर्तावर त्याच्या चित्रपटाची टक्कर सलमान खानच्या चित्रपटाशी होणार आहे.

सलमान खानचे चित्रपट आणि ईदचा मुहूर्त हे त्याच्यासाठी यशाचं गमक ठरलं आहे. दरवर्षी ईदच्या मुहूर्तावर भाईजानचा चित्रपट हमखास प्रेक्षकांच्या भेटीला येतो. मात्र, यावेळी त्याच्या चित्रपटाची टक्कर अक्षय कुमारच्या चित्रपटाशी होणार आहे.

हेही वाचा -VIDEO: अक्षयच्या 'बाला' गाण्यावर रितेशचा लाडक्या मुलांसोबत धमाल डान्स

अलिकडेच सलमान खानने त्याच्या 'राधे' चित्रपटाची घोषणा केली आहे. पुढच्या वर्षी ईदच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे. तर, अक्षय कुमारचा 'लक्ष्मी बॉम्ब' हा चित्रपट देखील ईदच्या दिवशी प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे आता बॉक्स ऑफिसवर दोघांच्याही चित्रपटांमध्ये चांगलीच चुरस पाहायला मिळेल.

हेही वाचा -यो यो हनी सिंगच्या आवाजातील 'पागलपंती'चं नवं गाणं प्रदर्शित

यावर्षीच्या दिवाळीमध्ये अक्षयचा 'हाऊसफुल ४' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट सध्या चांगली कमाई करत आहे. तर, सलमान खानचा 'दबंग ३' हा चित्रपट सध्या प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. पुढच्या वर्षी देखील अक्षय कुमार, 'सूर्यवंशी', 'गुड न्यूज' आणि 'लक्ष्मी बॉम्ब' या चित्रपटात झळकणार आहे. त्यामुळे आता बॉक्स ऑफिसवर या चित्रपटांना कसा प्रतिसाद मिळेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Intro:Body:

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.