ETV Bharat / sitara

करण जोहरच्या 'या' स्टूडंटची 'नो एन्ट्री' मध्ये एन्ट्री? - student of the year

'स्टूडंट ऑफ द ईयर-२' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवली नाही. मात्र, अनन्या, तारा आणि टायगरची केमेस्ट्री चांगली रंगली होती.

करण जोहरच्या 'या' स्टूडंटची 'नो एन्ट्री' मध्ये एन्ट्री?
author img

By

Published : Jun 20, 2019, 10:55 AM IST

मुंबई - करण जोहरच्या 'स्टूडंट ऑफ द ईयर'च्या दुसऱ्या भागातून दोन नवे चेहरे प्रेक्षकांच्या भेटीला आले. चंकी पांडे यांची मुलगी अनन्या आणि तारा सुतारीया या दोघींनीही आपल्या पहिल्याच चित्रपटातून प्रेक्षकांवर छाप पाडली. या चित्रपटानंतर लगेचच अनन्या पांडेची वर्णी 'पती पत्नी और वो'मध्ये लागली. तर, तारा सुतारीयालाही 'नो एन्ट्री' या चित्रपटाची ऑफर मिळाली आहे. त्यामुळे 'नो एन्ट्री' च्या सिक्वेलमध्ये तारा झळकणार असल्याचे बोलले जात आहे.

'स्टूडंट ऑफ द ईयर-२' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवली नाही. मात्र, अनन्या, तारा आणि टायगरची केमेस्ट्री चांगली रंगली होती. त्यामुळे ताराच्या अभिनयामुळे तिला इतर बऱ्याच चित्रपटांच्या ऑफर्स मिळू लागल्या आहेत. एका माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, ती आता 'नो एन्ट्री' चित्रपटात मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक अनीस बझ्मी यांची तिने अलिकडेच भेट घेतली होती. या चित्रपटात अर्जून कपूर मुख्य भूमिका साकारणार आहे. त्यामुळे अर्जून आणि ताराची जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळेल.

ताराने अलिकडेच 'मरजावां' चित्रपटाचेही शूटिंग संपवले आहे. या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा आणि रकुल प्रीतसोबत ती दिसणार आहे. तसेच, 'आरएक्स १००' या चित्रपटातूनही ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातून सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टी बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. त्यामुळे एक फ्रेश जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळेल.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.