मुंबई: अभिनेता सुशांतसिंह राजपूत यांच्या आत्महत्येप्रकरणी अंबोली पोलिस स्टेशनमध्ये मंगळवारी धर्मा या फिल्म प्रॉडक्शन्स कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अपूर्व मेहता यांची चौकशी करण्यात आली. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी रविवारी मेहता यांना समन्स बजावले होते.
यापूर्वी सोमवारी चित्रपट निर्माते महेश भट्ट यांचा जवाब मुंबई पोलिसांनी सांताक्रूझ पोलिस स्टेशनमध्ये नोंदवला होता. आतापर्यंत चित्रपट समीक्षक राजीव मसंद, चित्रपट निर्माते आदित्य चोप्रा, दिग्दर्शक-निर्माता संजय लीला भन्साळी यांच्यासह 40 जणांचे जवाब मुंबई पोलिसांनी नोंदवले आहेत.
हेही वाचा - 'गेम ऑफ थ्रोन्स' स्टार सोफी टर्नर आणि जो जोनास यांना कन्यारत्न
अभिनेता सुशांतसिंह राजपूत 14 जूनला मुंबईतील वांद्रे येथील निवासस्थानी मृत अवस्थेत आढळला होता.