हैदराबाद - ख्यातनाम फोटोग्राफर जी. वेंकटराम यांनी यंदाच्या अनोख्या कॅलेंडरचे प्रकाशन केले. यावेळी त्यांनी प्रसिद्ध चित्रकार राजा रवी वर्मा यांच्या पेंटींग्जची निवड केली होती. यासाठी जी. वेंकटराम यांनी प्रसिध्द १२ नायिकांची निवड केली.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
१२ सौंदर्यवती राजा रवी वर्मांच्या जगप्रसिध्द चित्रांसारख्या या कॅलेंडरमध्ये दिसत आहेत. इथे जी. वेंकटरामन यांच्या फोटोंची कमाल दिसून येते. सुपरस्टार कमल हासन यांची मुलगी श्रृती हासन, दाक्षिणात्य अभिनेत्री सामंथा रुथ प्रभू आणि बाहुबली चित्रपटातील सौंदर्यवती रम्या कृष्णन यासारख्या लोकप्रिय नायिकांचा समावेश आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
दाक्षिणात्य अभिनेत्री नादिया, अभिनेत्री खूशबू सुंदर, भरत नाट्य डान्सर शोभना आणि प्रियदर्शी या रुपवतींचा कलेंडरच्या फोटोंमध्ये समावेश आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
या कलाकारांसोबत प्रसिद्ध तामिळ अभिनेत्री ऐश्वर्या राजेश, मल्याळम अभिनेत्री लिसी लक्ष्मी आणि निर्माती अभिनेत्री लक्ष्मी मंचू यांच्याही फोटोंचा कॅलेंडरमध्ये समावेश आहे.या सर्व रुपवान अभिनेत्री मॉडेल्सनी जी वेंकटरमन यांच्या फोटोशूटमध्ये भाग घेत उत्तम कॅलेंडरच्या निर्मितीत सहभाग घेतला.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
जी. वेंकटरमन यांच्या या फोटोग्राफीला सर्वच स्तरातून दाद मिळत आहे. राजा रवी वर्मांची जशी चित्रे आहेत तसेच या फोटोंचे रिक्रियशन करण्यात आलंय.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
दक्षिणेतील लोकप्रिय दिग्दर्शक मनी रत्नम यांच्या पत्नी सुहासिनी यांच्या चॅरिटेबल ट्रस्टसाठी या कॅलेंडरची निर्मिती करण्यात आलीय.
सर्वच अभिनेत्रींना फोटोग्राफर जी. वेंकटरमन यांना या कॅलेंडरबद्दल धन्यवाद दिले आहेत.