मुंबई - प्रत्येक हृदयाच्या ठोका चुकवत बॉलिवूडची चांदणी म्हणेज श्रीदेवी यांची अचानक झालेली एक्झिट हा सर्वांसाठी मोठा धक्काच होता. त्याच्या निधनामुळे कलाविश्वात एक मोठी पोकळी निर्माण झाली. आजही त्यांच्या आठवणीत चाहतेदेखील भावुक होतात. आज त्यांचा जन्मदिन आहे. मात्र, मागच्या वर्षी त्यांच्या वाढदिवसाचं जंगी सेलिब्रेशन करण्यात आलं होत. त्यांचं हे सेलिब्रेश शेवटचं ठरलं. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
श्रीदेवी यांची मुलगी आणि अभिनेत्री जान्हवी कपूर हिनेही आपल्या आईचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
श्रीदेवी यांच्या जन्मदिनानिमित्त सोशल मीडियावरही त्यांच्या आठवणींना उजाळा दिला जात आहे.
जितेंद्रसोबतच्या नात्याविषयी झाल्या होत्या चर्चा -
श्रीदेवी आणि जितेंद्र दोघांनीही 'हिम्मतवाला', 'जानी दोस्त' यांसारख्या चित्रपटात भूमिका साकारल्या होत्या या चित्रपटानंतर त्यांच्या आणि जितेंद्र यांच्या नात्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र, श्रीदेवींनी या चर्चा केवळ अफवा असल्याचं म्हटलं होतं.
लग्नाआधीच होत्या प्रेग्नंट -
जितेंद्र यांच्यानंतर श्रीदेवींच्या आयुष्यात बोनी कपूर यांची एन्ट्री झाली. त्यांचं नातं चांगलंच बहरलं होतं. त्या लग्नाच्या आधीच प्रेग्नंट राहिल्यामुळे बोनी कपूर यांनी त्यांच्याशी मंदिरात साध्या पद्धतीने लग्नगाठ बांधली.
श्रीदेवी यांच्यासोबत लग्न झाल्यानंतर बोनी यांनी त्यांची पहिली पत्नी मोना यांच्यापासून वेगळे झाले. त्यांना पहिला मुलगा अर्जुन आणि मुलगी अंशुला देखील होते.
पुढे श्रीदेवींनी जान्हवी आणि खुशी यांना जन्म दिला.