ETV Bharat / sitara

'साहो'मधील श्रद्धा कपूरचा नवा अंदाज, पोस्टर प्रदर्शित - prabhas

या चित्रपटाच्या निमित्ताने श्रद्धा आणि प्रभास पहिल्यांदाच एकत्र पडद्यावर दिसणार आहेत. या चित्रपटाची बऱ्याच दिवसापासून चाहत्यांना आतुरता आहे. हिंदी, तमिळ, तेलुगू या ३ भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

'साहो'मधील श्रद्धा कपूरचा नवा अंदाज, पोस्टर प्रदर्शित
author img

By

Published : Jun 11, 2019, 8:25 AM IST

मुंबई - अभिनेत्री श्रद्धा कपूर ही लवकरच प्रभाससोबत 'साहो' चित्रपटात झळकणार आहे. 'साहो'च्या एका छोट्या टीजरमध्ये श्रद्धा कपूरची दमदार झलक पाहायला मिळाली होती. आता तिचा दमदार लूक असलेले पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे.

श्रद्धाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हे पोस्टर शेअर केले आहे. १३ जूनला या चित्रपटाचा नवा टीजर प्रेक्षकांना पाहायला मिळणार असल्याचेही तिने सांगितले.
या चित्रपटाच्या निमित्ताने श्रद्धा आणि प्रभास पहिल्यांदाच एकत्र पडद्यावर दिसणार आहेत. या चित्रपटाची बऱ्याच दिवसापासून चाहत्यांना आतुरता आहे. हिंदी, तमिळ, तेलुगू या ३ भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Shraddha Kapoors first poster from Saaho release
'साहो'मधील श्रद्धा कपूरचा नवा अंदाज, पोस्टर प्रदर्शित

श्रद्धा आणि प्रभास व्यतीरिक्त या चित्रपटात जॅकी श्रॉफ, मंदिरा बेदी, नील नितीन मुकेश, चंकी पांडे, महेश मांजरेकर, अर्जुन विजय आणि मुराली शर्मा हे कलाकारही झळकणार आहेत. अॅक्शन थ्रिलर असलेला हा चित्रपट १५ ऑगस्ट २०१९ रोजी प्रदर्शित होणार आहे.

श्रद्धा या चित्रपटानंतर वरुण धवनसोबत 'स्ट्रिट डान्सर' चित्रपटातही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तसेच टायगर श्रॉफसोबत 'बागी -३' आणि सुशांत सिंगसोबत 'छिछोरे' चित्रपटातही ती भूमिका साकारत आहे.

Intro:Body:

Ent 01

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.