मुंबई - अतुल काळे आणि सुदेश मांजरेकर यांचं दिग्दर्शन असलेल्या 'दे धक्का' या मराठी सिनेमाला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती. मनोरंजनाचा तडका आणि यासोबतच परिस्थितीशी दोन हात करत आपली स्वप्न पूर्ण करणाऱ्या एका कुटुंबीयाची कथा या चित्रपटातून प्रेक्षकांना २००८ साली पाहायला मिळाली. आता या चित्रपटाचा सिक्वलही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
या चित्रपटाचं दिग्दर्शन महेश मांजरेकर आणि सुदेश मांजरेकर करणार असून या सिनेमाची रिलीज डेटही घोषित करण्यात आली आहे. २०२० मध्ये ३ जानेवारीला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. सिद्धार्थ जाधव आणि शिवाजी सातम आणि मकरंद अनासपुरे यांच्या विनोदी धमाल मस्तीही प्रेक्षकांना सिक्वलमध्येही पाहायला मिळणार आहे.
-
Sequel to #Marathi film #DeDhakka... #DeDhakka2 to release on 3 Jan 2020... Stars Siddharth Jadhav, Shivaji Satam and Makarand Anaspure... Directed by Mahesh Manjrekar and Sudesh Manjrekar... Produced by Yatin Jadhav and Swati Khopkar. pic.twitter.com/0CgHcgbAWM
— taran adarsh (@taran_adarsh) July 24, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Sequel to #Marathi film #DeDhakka... #DeDhakka2 to release on 3 Jan 2020... Stars Siddharth Jadhav, Shivaji Satam and Makarand Anaspure... Directed by Mahesh Manjrekar and Sudesh Manjrekar... Produced by Yatin Jadhav and Swati Khopkar. pic.twitter.com/0CgHcgbAWM
— taran adarsh (@taran_adarsh) July 24, 2019Sequel to #Marathi film #DeDhakka... #DeDhakka2 to release on 3 Jan 2020... Stars Siddharth Jadhav, Shivaji Satam and Makarand Anaspure... Directed by Mahesh Manjrekar and Sudesh Manjrekar... Produced by Yatin Jadhav and Swati Khopkar. pic.twitter.com/0CgHcgbAWM
— taran adarsh (@taran_adarsh) July 24, 2019
यतीन जाधव आणि स्वाती खोपकर दे धक्का २ ची निर्मिती करणार आहेत. प्रदर्शनाच्या तारखेसोबतच सिनेमाचं पहिलं पोस्टरही प्रदर्शित करण्यात आलं आहे. या पोस्टरमध्ये वेलकम टू लंडन असं म्हटलं आहे. त्यामुळे, आता सिक्वलची कथा नेमकी काय असणार आणि याचा लंडनशी काय संबंध आहे, याबद्दलची प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.