ETV Bharat / sitara

‘ज्यासाठी लढला हर एक मावळा’ अशी टॅगलाईन असलेल्या ‘सतराशे एक पन्हाळा’ या ऐतिहासिक चित्रपटाचा मुहूर्त झाला संपन्न! - Satrashe ek Panhala movie update

नजीकच्या काळात बऱ्याच ऐतिहासिक चित्रपटांची निर्मिती होताना दिसतेय. त्यातच मराठीमध्ये शिवकालीन चित्रपटांना मोठ्या प्रमाणात यश मिळत असल्यामुळे त्या काळातील चित्रपट बनताना दिसत आहेत. अजून एक शिवकालीन कथानक असलेला चित्रपट ‘सतराशे एक पन्हाळा’ निर्माणाधीन आहे. व्ही. एस. गोगावले प्रॉडक्शन निर्मित अतिशय भव्य अश्या ‘सतराशे एक पन्हाळा’ या ऐतिहासिक चित्रपटाचा मुहूर्त भोर येथील राजवाड्यात मोठ्या दिमाखात संपन्न झाला.

Satrashe ek Panhala
http://10.10.50.85//maharashtra/06-March-2022/mh-mum-ent-satarashe-ek-panhala-muhurat-mhc10001_06032022012226_0603f_1646509946_384.jpeg
author img

By

Published : Mar 6, 2022, 4:54 PM IST

नजीकच्या काळात बऱ्याच ऐतिहासिक चित्रपटांची निर्मिती होताना दिसतेय. त्यातच मराठीमध्ये शिवकालीन चित्रपटांना मोठ्या प्रमाणात यश मिळत असल्यामुळे त्या काळातील चित्रपट बनताना दिसत आहेत. अजून एक शिवकालीन कथानक असलेला चित्रपट ‘सतराशे एक पन्हाळा’ निर्माणाधीन आहे. व्ही. एस. गोगावले प्रॉडक्शन निर्मित अतिशय भव्य अश्या ‘सतराशे एक पन्हाळा’ या ऐतिहासिक चित्रपटाचा मुहूर्त भोर येथील राजवाड्यात मोठ्या दिमाखात संपन्न झाला. या प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा जयजयकार करण्यात आला. त्यामुळे अत्यंत भारावलेल्या या वातावरणात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले आणि श्री गणेशाची आरती करून सोहळा संपन्न झाला.

Satrashe ek Panhala
‘सतराशे एक पन्हाळा’
या सोहळ्याला चित्रपटाचे निर्माते स्वप्नील गोगावले, सह-निर्माते कुणाल कांबळे, दिग्दर्शक मिथिलेश सूर्यवंशी, डी.ओ.पी. अजित रेड्डी, अभिनेते मिलिंद दास्ताने, प्रकाश गरुड, अभिनेत्री पूनम कापसे, सह कलाकार, तंत्रज्ञ यांच्यासह अभिनेते सुशांत शेलार व अमराळे ज्वेलर्सचे स्वप्नील अमराळे यांची विशेष उपस्थिती लाभली.यावेळी बोलताना चित्रपटाचे निर्माते स्वप्नील गोगावले म्हणाले "निर्माता म्हणून हा माझा पहिलाच चित्रपट आहे, छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहेत त्यामुळे चित्रपट निर्मिती क्षेत्रात पदार्पण करताना त्यांच्या काळात घडलेल्या प्रसंगावर एक भव्य ऐतिहासिक चित्रपट करायचा असे स्वप्न बघितले होते. आज हे स्वप्न प्रत्यक्षात उतरताना बघून मी खूप भारावून गेलो आहे. 'सतराशे एक पन्हाळा' साठी आमचे सह-निर्माते कुणाल कांबळे, दिग्दर्शक मिथिलेश आणि संपूर्ण टीमने गेले काही महिने खूप कसून मेहनत घेतली आहे आणि आज त्याची प्रत्यक्ष निर्मिती होत आहे हे बघून आम्हाला आनंद होत आहे."अभिनेते सुशांत शेलार म्हणाले "आजपर्यंत मी बऱ्याच चित्रपटात काम केले परंतु ऐतिहासिक चित्रपटात काम करण्याची संधी कधी मिळाली नाही. 'सतराशे एक पन्हाळा'च्या निमित्ताने आज ही संधी मला मिळाली याचा आनंद आहे. त्यामुळे या चित्रपटात आपले योगदान देण्यासाठी मी खूप उत्सुक आहे." या प्रसंगी "आम्ही सगळयांनी गेले काही महिने घेतलेली मेहनत आज फळाला आलेली बघून मी खूप भावनिक झालो आहे" असे सह-निर्माते कुणाल कांबळे यांनी नमूद केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जितेंद्र वाईकर यांनी केले.‘ज्यासाठी लढला हर एक मावळा’ अशी टॅगलाईन असलेल्या 'सतराशे एक पन्हाळा’ या चित्रपटात खंदया कलाकारांची फौज असणार आहे. त्यांची नावे गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.